गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘लाफ्टर शेफ’च्या सेटवर एकामागून एक भीषण अपघात, राहुल वैद्यवर उडाला आगीचा मोठा भडका, रीम शेखचाही चेहरा भाजला अन्…; नेमकं काय झालं?

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 22, 2024 | 12:26 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Laughter Chef set Reem Shaikh Singer Rahul Vaidya and Sudesh Lahiri accident

'लाफ्टर शेफ'च्या सेटवर रीम शेख आणि राहुल वैद्य आगीमुळे भाजले तर सुदेश लाहिरी यांनाही गंभीर दुखापत

कलर्सचा वाहिनीवरील ‘लाफ्टर शेफ’ हा रिअ‍ॅलिटी शो सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना भरपूर कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. अनेक टीव्ही कलाकार आपल्या उपस्थितीने या शोला चार चाँद लावताना दिसतात. पण या शोबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. एकीकडे शोच्या प्रत्येक भाग यशाच्या दिशेने झेप घेत असताना, दुसरीकडे मात्र सेटवर अनेक कलाकार जखमी होत आहेत. प्रथम रीम शेखचा चेहरा भाजला. गायक राहुल वैद्यही आगीत वेढलेले दिसले. अशातच आता सुदेश लाहिरी यांच्या दुखापतीबद्दलही एक बातमी समोर येत आहे. (Laughter Chef Set Accident)

कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘लाफ्टर शेफ’चा प्रोमो शेअर केला आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, राहुल वैद्य आपला जोडीदार अली गोनीबरोबर स्वयंपाक करत असताना त्याच्या चेहऱ्यावर आगीचा भडका येतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला राहुलचा आरडाओरडा करतानाचा आवाज येईल. त्याचबरोबर बाकीचे स्पर्धकही इतके घाबरतात की तेही ओरडू लागतात. राहुलची अवस्था पाहून निया शर्मा आणि जन्नत जुबेर यांच्या हातातून जेवण सटकते. हा व्हिडिओ खरोखरच भीतीदायक आहे. सध्या राहुल ठीक आहे, त्याला फारशी गंभीर दुखापत झालेली नाही. तो थोडक्यात बचावला आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – Video : परदेशात नाटकाला मिळालेला प्रतिसाद पाहून भारावला संकर्षण कऱ्हाडे, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “कधीही वाटलं नव्हतं की…”

रीम शेखचाही चेहरा भाजला आहे, याचा प्रोमोदेखील शेअर करण्यात आला आहे. रीम भारती सिंगशी बोलत होती आणि एका भांड्यात काहीतरी तळत होती, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर तेल उडते आणि यामुळे तिचा चेहरा भाजला असल्याचे म्हटलं जात आहे. या घटनेनंतर सेटवरील सर्वजण रीमला पाहण्यासाठी धावतात. रीम स्वयंपाक करत असताना तिच्या चेहऱ्यावर गरम तेलाचे ठिपके पडले, ज्यामुळे डोळ्याजवळ तिच्या चेहऱ्यावर खुणा आल्या. नुकतेच रीमने तिच्या लेटेस्ट फोटोंद्वारे तिच्या चेहऱ्याची अवस्था दाखवली. या संपूर्ण अपघाताचा उल्लेखही तिने केला होता. या फोटोंमध्ये त्याच्या चेहऱ्यावर अनेक डाग आणि खुणा स्पष्ट दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “आपण निक्कीला कितीही शिव्या घातल्या तरी…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचे विधान, म्हणाला, “वर्षा यांना कॅप्टन केलं असतं तर…”

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शोमध्ये स्वयंपाक करत असताना सुदेश लाहिरीला चुकून नियाने चाकू मारला. त्यांच्या बोटातून सतत रक्तस्त्राव होत होता. त्याला तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. जखमी असूनही सुदेश लाहिरीने शूटिंग पूर्ण केले आणि बरे होण्यासाठी फक्त एक दिवस सुट्टी घेतली. दरम्यान, ‘लाफ्टर शेफ’ हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवर सुरु आहे. या कार्यक्रमात सहा जोड्या स्वयंपाक करताना दिसत आहेत. त्यामध्ये कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा, जन्नत जुबेर आणि रीम, अली गोणी आणि राहुल वैद्य, अर्जुन बिजलानी आणि करण कुंद्रा, अंकिता लोखंडे आणि विकी जैन, निया शर्माची जोडी दिसत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती सिंह करताना दिसत आहे.

Tags: Laughter Chef Set AccidentRahul Vaidya Fire AccidentReem Sheikh AccidentSudesh Lahiri Injured
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
The Family Man 3 updates bollywood actor Jaideep Ahlawat will also part of the series see the details

The Family Man 3 मध्ये 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, खास लूकने वेधलं लक्ष, नेमकी भूमिका काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.