सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

The Family Man 3 मध्ये ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, खास लूकने वेधलं लक्ष, नेमकी भूमिका काय?

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 22, 2024 | 1:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
The Family Man 3 updates bollywood actor Jaideep Ahlawat will also part of the series see the details

‘द फॅमिली मॅन ३’ मध्ये सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता जयदीप अहलावतचीदेखील एन्ट्री, नेमकी भूमिका काय?

The Family Man 3 : ‘द फॅमिली मॅन’ ही सर्वात लोकप्रिय ओटीटी वेबसिरिजपैकी एक आहे आणि लवकरच या सिरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते ‘द फॅमिली मॅन ३’ची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशातच आता प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी सिरिजमध्ये एका नव्या कलाकाराचा समावेश केला आहे. हा अभिनेता म्हणजे जयदीप अहलावत, जो बॉलिवूडमधील व ओटीटी विश्वातील एक उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपट व वेबसिरीजमध्ये काम केले आहे. ‘द फॅमिली मॅन’ने प्राइम व्हिडिओच्या सर्वोत्कृष्ट वेब सीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामधील मनोज तिवारीसह सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. आणि आता जयदीप अहलावतही त्यांच्या दमदार अभिनयाने ही सिरिज आणखी रोमांचक करणार आहेत. (The Family Man 3 Updates)

या सिरिजमध्ये जयदीप अहलावतच्या आगमनानंतर, मनोज बाजपेयींच्या फॅमिली मॅन या सिरिजबद्दल लोकांची उत्कंठा वाढणार आहे, कारण जयदीप अहलावत एक उत्कृष्ट अभिनेता आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या बातमीनुसार, जयदीप अहलावतने ‘द फॅमिली मॅन ३’ मध्ये प्रवेश केला आहे. या सुपरहिट वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये मनोज बाजपेयीबरोबर जयदीप अहलावतही दिसणार आहे. काही वृत्तांमधून असे समोर आले आहे की, फॅमिली मॅन या सिरिजमधील कलाकारांमध्ये जयदीप सामील झाले आहेत आणि त्यांचे शूटिंगदेखील सुरु झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Jaideep Ahlawat (@jaideepahlawat)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “आपण निक्कीला कितीही शिव्या घातल्या तरी…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचे विधान, म्हणाला, “वर्षा यांना कॅप्टन केलं असतं तर…”

‘पाताळ लोक’मधील दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला जयदीप अहलावत ‘द फॅमिली मॅन 3’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ते नकारात्मक भूमिकेत दिसणार की मनोज बाजपेयीबरोबर मिशनमध्ये काम करणार हे स्पष्ट झालेले नाही. ‘आक्रोश’, ‘खट्टा मीठा’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘रईस’, ‘राझी’, ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘बागी ३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेले जयदीप अहलावत ‘महाराज’ चित्रपटातही दिसले होते.

आणखी वाचा – ‘लाफ्टर शेफ’च्या सेटवर एकामागून एक भीषण अपघात, राहुल वैद्यवर उडाला आगीचा मोठा भडका, रीम शेखचाही चेहरा भाजला अन्…; नेमकं काय झालं?

दरम्यान, ‘द फॅमिली मॅन’चा पहिला सीझन २०१९ मध्ये रिलीज झाला होता. दूसरा सीझन २०२१ मध्ये रिलीज झाला आणि हे दोन्ही सीझन सुपरहिट झाले आहेत. आता चाहत्यांना लवकरच प्रदर्शित होणाऱ्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या दोन्ही सीझनमध्ये मनोज वाजपेयीचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळाला, पण आता जयदीप अहलावतचा जबरदस्त अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक ‘द फॅमिली मॅन ३’ या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Tags: The Family Man 3The Family Man 3 OTT SeriesThe Family Man 3 Series
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bollywood actor Parvin Dabas car accident in Mumbai now condition is stable see the details

बॉलिवूड अभिनेत्याचा मुंबईमध्ये झाला होता मोठा अपघात, आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर अशी झाली आहे अवस्था

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.