बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या एका वाक्याला किंवा एखाद्या शब्दाला खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्यातील एक आघाडीचे व चर्चेत राहणारे अभिनेते म्हणजे जॅकी श्रॉफ. ८० व ९० च्या दशकामध्ये जॅकी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘हिरो’, ‘राम लखन’, ‘देवदास’, ‘खलनायक’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांच्या अभिनयाबरोबरच बोलण्याच्या वेगळ्या शैलीमुळे ते अधिक लोकप्रिय आहेत. जॅकी यांच्या ‘भिडू’ या शब्दाला आतापर्यंत खूपच लोकप्रियता मिळाली. अनेकांनी आतापर्यंत त्यांच्या या शब्दाचा वापर करुन मिमीक्रि केली. पण आता प्रत्येकालाच जॅकी यांचा ‘भिडू’ शब्द वापरता येणार नाही. (jackie shroff on publicity rights)
जॅकी त्यांच्या बोलण्याच्या वेगळ्या अंदाजामुळे व बेधडक वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. ते कोणाशीही संवाद साधताना नेहमी ‘भिडू’ या शब्दाचा वापर करतात. पण जॅकी यांच्या या शब्दाचे अनुकरण सगळे जण करु लागले. पण आता इतरांवर शब्द वापरण्यावर बंधनं येणार आहेत. याबाबत आता स्वतः जॅकी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Actor Jackie Shroff moves Delhi High Court seeking protection of his personality and publicity rights. The suit has been filed against various entities using his name, photographs, voice and word "Bhidu" without his consent.
— ANI (@ANI) May 14, 2024
(file pic) pic.twitter.com/BQpn38yV7v
जॅकी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये खासगी व पब्लिसिटी अधिकारांची मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे आता त्यांच्या सहमतीशिवाय त्यांचे नाव, आवाज व ‘भिडू’ या शब्दाचा वापर करता येणार नाही. असे केल्यास संबंधित संस्था किंवा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो.
याबद्दल जॅकी यांनी सांगितले की, “माझा आवाज, नाव व ‘भिडू’ या शब्दाचा वापर सोशल मीडिया व एआई व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर वापरला जाऊ नये. जर वापर करायचा असेल तर त्याची परवानगी आधी घ्यावी लागेल. अशी याचिका मी न्यायालयासमोर दाखल केली आहे. याबाबतची सुनावणी १५ मे रोजी होणार आहे”.
अशी याचिका पाहिल्यांच दाखल झाली नसून बॉलिवूड शेहनशान अमिताभ बच्चन यांनी देखील अशा प्रकारची याचिका दाखल केली होती. याबाबत न्यायालयाने सुनावणी करत त्यांचे सर्व अधिकार बाधित ठेवण्याचा आदेशही जारी करण्यात आला होता. दरम्यान जॅकी यांच्या याचिकेवर काय सुनावणी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.