शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : जॅकी श्रॉफ यांच्यासारखं ‘भिडू’ बोलणं आता महागात पडणार, अभिनेत्यानेकडून न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 14, 2024 | 2:33 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
jackie shroff on publicity rights

Video : जॅकी श्रॉफ यांच्यासारखं 'भिडू' बोलणं आता महागात पडणार, अभिनेत्यानेकडून न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या एका वाक्याला किंवा एखाद्या शब्दाला खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्यातील एक आघाडीचे व चर्चेत राहणारे अभिनेते म्हणजे जॅकी श्रॉफ. ८० व ९० च्या दशकामध्ये जॅकी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘हिरो’, ‘राम लखन’, ‘देवदास’, ‘खलनायक’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांच्या अभिनयाबरोबरच बोलण्याच्या वेगळ्या शैलीमुळे ते अधिक लोकप्रिय आहेत. जॅकी यांच्या ‘भिडू’ या शब्दाला आतापर्यंत खूपच लोकप्रियता मिळाली. अनेकांनी आतापर्यंत त्यांच्या या शब्दाचा वापर करुन मिमीक्रि केली. पण आता प्रत्येकालाच जॅकी यांचा ‘भिडू’ शब्द वापरता येणार नाही. (jackie shroff on publicity rights)

जॅकी त्यांच्या बोलण्याच्या वेगळ्या अंदाजामुळे व बेधडक वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. ते कोणाशीही संवाद साधताना नेहमी ‘भिडू’ या शब्दाचा वापर करतात. पण जॅकी यांच्या या शब्दाचे अनुकरण सगळे जण करु लागले. पण आता इतरांवर शब्द वापरण्यावर बंधनं येणार आहेत. याबाबत आता स्वतः जॅकी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आणखी वाचा – सरगमला सून समजताच अक्षरा दुखावली जाणार, समोर येत केला खुलासा, भुवनेश्वरीचा हा नवा डाव येणार का लक्षात?

Actor Jackie Shroff moves Delhi High Court seeking protection of his personality and publicity rights. The suit has been filed against various entities using his name, photographs, voice and word "Bhidu" without his consent.

(file pic) pic.twitter.com/BQpn38yV7v

— ANI (@ANI) May 14, 2024

जॅकी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये खासगी व पब्लिसिटी अधिकारांची मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे आता त्यांच्या सहमतीशिवाय त्यांचे नाव, आवाज व ‘भिडू’ या शब्दाचा वापर करता येणार नाही. असे केल्यास संबंधित संस्था किंवा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मध्ये सात वर्षांनी पुन्हा येणार दयाबेन, मालिकेतील अभिनेत्रीनेच केला खुलासा, “या पात्रासाठी…”

याबद्दल जॅकी यांनी सांगितले की, “माझा आवाज, नाव व ‘भिडू’ या शब्दाचा वापर सोशल मीडिया व एआई व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर वापरला जाऊ नये. जर वापर करायचा असेल तर त्याची परवानगी आधी घ्यावी लागेल. अशी याचिका मी न्यायालयासमोर दाखल केली आहे. याबाबतची सुनावणी १५ मे रोजी होणार आहे”.

अशी याचिका पाहिल्यांच दाखल झाली नसून बॉलिवूड शेहनशान अमिताभ बच्चन यांनी देखील अशा प्रकारची याचिका दाखल केली होती. याबाबत न्यायालयाने सुनावणी करत त्यांचे सर्व अधिकार बाधित ठेवण्याचा आदेशही जारी करण्यात आला होता. दरम्यान जॅकी यांच्या याचिकेवर काय सुनावणी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.   

Tags: bhidu wordbollywoodjackiejackie shorff
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Akshaya Deodhar Birthday Celebration

Video : बायकोच्या वाढदिवसाला राणादा जोमात, हॉटेलमध्ये सरप्राइज पार्टी, धमाल-मस्ती अन्…; सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.