गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गोविंदा व पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, सोशल मीडियाद्वारे अभिनेत्याने शेअर केलेला फोटो चर्चेत, म्हणाला, “ही भेट होणं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 24, 2024 | 1:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
govinda with pm narendra modi

गोविंदा व पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, सोशल मीडियाद्वारे अभिनेत्याने शेअर केलेला फोटो चर्चेत, म्हणाला, "ही भेट होणं…"

सध्या बॉलीवूडमधील अनेक मोठे चेहरे राजकारणात प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकांच्याआधी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांना राजकारणात संधी मिळाली. अभिनेत्री कंगना रनौत, अरुण गोविल, गोविंदा अशा अनेक कलाकारांनी राजकारणाची वाट धरली. अशातच आता गोविंदा चर्चेत आला आहे. सध्या गोविंदा कोणत्याही चित्रपटात दिसून येत नाही. मात्र पुन्हा त्याने राजकारणात प्रवेश केला असून शिवसेना या पक्षात दाखल झाला आहे. या दरम्याने त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेतली. तसेच राजकारणाबद्दल त्यांच्याशी संवाददेखील साधला. (govinda with pm narendra modi)

गोविंदाने मुंबईयेथे नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सोशल मीडियावर गोविंदाने नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचे फोटो देखील शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये गोविंदा मोदी यांच्याशी हात मिळवत असलेले दिसत आहेत. तसेच एकमेकांना स्मितहास्य देखील देत आहेत. हे सर्व फोटो निवडणुका प्रचारदरम्यानचे आहेत. यावेळी गोविंदा पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला असून मोदी यांनी क्रीम कलरच्या कुर्त्यामध्ये दिसत आहेत.

आणखी वाचा – Video : बायकोने दत्तू मोरेला गिफ्ट केली महागडी बाईक, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “बायको…”

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

हा फोटो शेअर करत गोविंदाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मुंबईमध्ये प्रचारादरम्यान भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली. त्यांची भेट होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे”. मोदींना भेटण्याआधी गोविंदाची भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील भेट झाली होती. त्यावेळीदेखील फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “भारताचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह याच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे”.

आणखी वाचा – ईशा-अनिशचाही घटस्फोट होणार, विचित्र वागल्यानंतर अरुंधतीने मुलगी म्हणण्यासही दिला नकार, आणखी एक संसार मोडणार

लोकसभा निवडणूक २०२४ साली गोविंदाने राजकारणात पुन्हा प्रवेश केला होता. सध्या तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाला आहे. त्यावेळी बिजनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार त्यांनी सांगितले होत की, “ मी १४ वर्षांच्या वनवासानंतर राजकारणात पुन्हा प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई अधिक सुंदर व विकसित दिसत आहे”. यावर एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितले की, “गोविंदा राजकारणातील एक खिलाडी आहेत. ते नरेंद्र मोदी यांच्या विचारांना पाठिंबा देतात. तसेच त्यांना फिल्म जगतात त्यांना प्रगती करायची आहे. मला खात्री आहे की ते सरकार व चित्रपट सृष्टीमध्ये एक दुवा बनतील”.

दरम्यान गोविंदाने नरेंद्र मोदी यांच्याबरोबर शेअर केलेल्या फोटोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. तसेच सध्या त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो अभिनय क्षेत्रापासून लांब असून राजकारणात अधिक सक्रिय झालेला दिसून येत आहे.     

Tags: govindameetingpm narendra modi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Navri Mile Hitlerla serial Actor Prasad Limaye new entry promo viral

'नवरी मिळे हिटलरला'मध्ये लीला-ऐजेच्या नात्यात गोंधळ, तर दुसरीकडे मालिकेत नव्या अभिनेत्याची एन्ट्री, कथेला नवं वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.