शनिवार, ऑगस्ट 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये लीला-ऐजेच्या नात्यात गोंधळ, तर दुसरीकडे मालिकेत नव्या अभिनेत्याची एन्ट्री, कथेला नवं वळण

Saurabh Moreby Saurabh More
मे 24, 2024 | 1:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla serial Actor Prasad Limaye new entry promo viral

'नवरी मिळे हिटलरला'मध्ये लीला-ऐजेच्या नात्यात गोंधळ, तर दुसरीकडे मालिकेत नव्या अभिनेत्याची एन्ट्री, कथेला नवं वळण

झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. यातील सर्वांची लोकप्रिय मालिका म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’. या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारताना दिसत आहे. दोघांचीही या मालिकेमध्ये केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकॅनचे लक्ष वेधून घेत आहे.

अशातच मालिकेत एक नवीन एंट्री झाली आहे. ‘पुढचं पाऊल’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता प्रसाद लिमयेची ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये जबरदस्त एंट्री झाली आहे. सध्या मालिकेत एजेच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे एजेची आई सरोजिनी जहागीरदारांनी दुर्गाचा नवरा किशोर जहागीरदारलादेखील लग्नाचं आमंत्रण देण्याबाबत एजेला सांगितलं. यावेळी एजेने हा निर्णय दुर्गाने घ्यावा असं स्पष्ट सांगितलं. त्यामुळे आता दुर्गा काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – नेत्राला देवीआईचा संकेत, पाचव्या पेटीपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड, तर रुपालीला पुन्हा विरोचकाकडून नवी शक्ती मिळण्याची शक्यता

किशोरला एजेचा लग्नाचं आमंत्रण मिळणार का? आणि किशोर एजेच्या लग्नात साळुंखेबरोबर काही कारस्थान रचणार का? तसंच किशोर आणि एजेमध्ये नेमका काय वाद आहे? किशोर जहागीरदार कुटुंबापासून दूर का राहतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तर येत्या भागात समोर येणार आहेत.

आणखी वाचा – अभिमानास्पद! अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेता प्रसाद लिमयेने याआधी ‘पुढचं पाऊल’ ही मालिका केली होती. त्यानंतर तो बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकला. ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत तो पाहायला मिळाला. तसंच ‘बेधडक’, ‘What’sup लग्न’, ‘मोगरा फुलला’, ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांमधून त्याने अभिनय केला आहे. अशातच आता अभिनेता पुन्हा एकदा ‘नवरी मिळे हिटलरला’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Tags: marathi entertainment newsNavri Mile HitlerlaPrasad Limaye
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rashmika Mandanna Injury
Entertainment

शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत, आठवडाभर विश्रांतीची गरज, सेट कोसळला आणि…

ऑगस्ट 1, 2026 | 11:01 am
Arbaj Shaikh Father Passes Away
Entertainment

‘सैराट’ फेम अभिनेत्याला पितृशोक; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, रुग्णालयात उपचारादरम्यान…

जुलै 31, 2026 | 11:24 am
Patri Sarkar 1942
Entertainment

इतिहासातील एक धगधगतं पर्व रुपेरी पडद्यावर, क्रांतीची गाथा सांगणाऱ्या ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

जुलै 31, 2026 | 11:22 am
Taarak Mehta ka ooltah chashmah
Entertainment

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकूनही शूटिंग ठेवलं सुरु, ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…

जुलै 31, 2026 | 11:21 am
Next Post
Dattu More Answers to Netizens

"गाडीपर्यंत पाय पुरतात का?", बायकोने बाईक गिफ्ट करताच दत्तू मोरेला नेटकऱ्याचा खोचक प्रश्न, अभिनेता म्हणाला, "गाडी घेतली कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.