शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा शिवसेनेमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निर्णय, म्हणाला, “माझ्या वनवासानंतर…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 28, 2024 | 6:05 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actor Govinda has joined Eknath Shinde's Shivsena see the details

सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा शिवसेनेमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निर्णय, म्हणाला, "माझ्या वनवासानंतर..."

आगामी लोकसभा निवणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आगामी निवडणुकींच्या तोंडावर अनेक लोक पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता गोविंदानेही नुकताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. गोविंदाने शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती आणि अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदाच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 

गोविंदा शिवसेनेकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याची कृष्णा हेगडे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोविंदाच्या रुपात शिवसेनेकडून नवीन चेहरा म्हणून गोविंदाला उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 

आणखी वाचा – Video : बऱ्याच दिवसांनी बायको-लेकासह पुण्याच्या घरी पोहोचला शशांक केतकर, आईने बनवली सालपापडी, म्हणाला, “तांदूळ भिजवून…”

शिंदे गटात गेल्यानंतर गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. १४ वर्षांच्या वनवासानंतर आता पुन्हा राजकारणात प्रवेश करत असल्याचे मत गोविंदाने व्यक्त केले. यावेळी त्याने असं म्हटलं आहे की, “२०१९ ला राजकारणातून बाहेर पडल्यानंतर मी पुन्हा या क्षेत्रात येईन असं मला वाटलं नव्हतं. पण माझ्या वनवासानंतर मी पुन्हा रामराज्य असलेल्या पक्षात येत आहे. त्यामुळे मला दिलेली ही जबादारी मी इमानदारीने पार पाडेन”.

आणखी वाचा – लेकीसह भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये राहायला जाणार ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन, आराध्याला बच्चन कुटुंबियांपासूनही दूर ठेवणार कारण…

दरम्यान, गोविंदाने २००४ साली उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता. गोविंदाची प्रसिद्धी लक्षात घेता त्याला तिकीट देऊन काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. नंतरच्या काळात गोविंदाने राजकारणाला रामराम करत आपला मोर्चा पुन्हा एकदा अभिनयाकडे वळवला. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने राजकारणात एन्ट्री केली आहे.

Tags: bollywood actorgovindaGovinda Shivsena Party joinedshivsena
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Anushka sharma instagram post

लेकाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट, आता अशी दिसते अभिनेत्री, नेटकरी म्हणाले, "वहिनी IPL पाहण्यासाठी कधी येणार?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.