बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता फरहान अख्तर सध्या खूप चर्चेत असलेला बघायला मिळतो. २००१ साली प्रदर्शित झालेल्या आणि आजही लोकप्रिय असलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले आहे. तसेच ‘डॉन’ या चित्रपटाचेदेखील त्याने दिग्दर्शन केले आहे. तसेच त्याचे ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘रॉक ऑन’, ‘तूफान’, ‘दिल धडकने दो’ या चित्रपटांमध्येही काम करताना दिसला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. आज फरहानचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. (farhan akhatar and shibani dandekar married life)
फरहान २००० साली अधुना भबानीबरोबर लग्नबंधनात अडकला. मात्र त्यांच्यामध्ये भेदभाव झाल्याने दोघही २०१७ साली वेगळे झाले. त्यांना दोन मुलीदेखील आहेत. त्यानंतर फरहान व शिबानी दांडेकर यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२२ मध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघांचेही अनेक फोटोदेखील समोर आले होते. अशातच फरहान व शिबानी रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याणए त्याच्या संसाराबद्दल भाष्य केले आहे.
फरहान व शिबानी साखरपुड्याच्या काही दिवसांतच थेरपी घेण्यास सुरुवात केली होती. लग्नानंतरही दोन दिवसांतच ते थेरपी घेण्यासाठी पोहोचले होते. याबद्दल बोलताना शिबानीने सांगितले की, “आम्ही साखरपुड्याच्या ६ महीने आधीच थेरपी घेण्यास सुरुवात केली होती. हे एका जिमला जाण्यासारखे आहे. आपल्याला यावर काम करत राहावे लागते. आम्ही अनेक सेशन घेतले आहेत. अनेकदा तर आम्ही आत जायचो आणि आमच्याकडे बोलायला काहीही नव्हतं आणि अनेकदा तर बोलायला खूप काही असायचं”.
पुढे ती म्हणाली की, “आमच्यावर अशीही वेळ यायची की आम्ही घरी भांडायचो पण आम्हाला थेरपिस्टला भेटायचं आहे हे माहीत होतं. आम्ही लग्नाच्या दोन दिवसानंतर थेरपी घेण्यासाठी गेलो होतो. सोमवारी आमचं लग्न झालं आणि आम्ही बुधवारी थेरपिस्टकडे गेलो होतो. त्यावेळी थेरपिस्टदेखील आश्चर्यचकित झाले होते. तुम्ही इथे काय करताय? असंही त्यांनी आम्हाला विचारले. आता २४ तासांपूर्वी लग्न केलं होतं”. दरम्यान सध्या दोघांचाही सुखी संसार सुरु आहे.