बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक म्हणजे लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री मलायका अरोरा. या कपलचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये या जोडप्याच्या लग्नाची नेहमीच आतुरता असते. मात्र त्यांच्यात आता काही आलबेल नसून त्यांच्या नात्याविषयीच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याआधी ही जोडी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसली होती. मात्र आता त्यांच्यात काहीतरी बिनसले असून त्यांच्या ब्रेकअपच्या अनेक चर्चाही सोशल मीडियावबर व्हायरल होत आहेत. नुकतंच अंबानींच्या लग्नात अभिनेता दिसला होता. पण अभिनेत्री सुट्टीवर होती.
मलायकाने परदेशातून एका मिस्ट्री मॅनबरोबरचा फोटो शेअर केल्यामुळेही अनेक चर्चांना उधाण आले. अशातच आता अर्जुन कपूरने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे त्यांच्या नात्याविषयीच्या अनेक चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. या दोघांनी ब्रेकअप झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पण अर्जुनने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये त्याला मलायकापासूनचे अंतर सहन होत नसल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा – Video : गावी भातलावणी, भजन अन् खेकडे पकडण्यात रमला निखिल बने, व्हिडीओद्वारे दाखवली खास झलक, साधेपणाचं कौतुक
शुक्रवार, १९ जुलै रोजी अर्जुन कपूरने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे एक नोट शेअर केली. त्यात त्याने लिहिले होते की, “सकारात्मक असण्याचा अर्थ असा नाही की गोष्टी ठीक होतील. त्याचा अर्थ असा आहे की गोष्टी कशाही झाल्या तरीही तुम्ही ठीक असाल”. यापूर्वी, अभिनेत्याने जून महिन्यात अशीच एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने “आयुष्यात आपल्यासमोर दोन पर्याय आहेत. एकतर आपण आपल्या भूतकाळात हरवून जातो किंवा भविष्याचा विचार करून पुढे जातो” असं म्हटलं होतं.
आणखी वाचा – आता विषय हार्ड व्हनार! ‘तुला शिकवीन…’ फेम अधिपती-अक्षरा परदेशात करत आहेत एन्जॉय, व्हिडीओ चर्चेत
अर्जुन-मलायका यांच्या नात्याबाबत नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट काही नवीन नाहीत. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत असतात. पण मलायका-अर्जुन कधीही या अफवांवर व्यक्त होताना दिसत नाहीत. दोघंही बरीच वर्ष एकमेकांबरोबर आहेत, पण दोघांचाही लग्नाचा कोणताच विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.