बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही काळापासून खूप सक्रिय असलेला दिसून येत आहे. आजवर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. त्याचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. यामध्ये त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. अर्जुनच्या भूमिकेला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू करु शकला नाही. २०२३ साली त्याचा ‘द लेडी किलर’ हा चित्रपट भेटीस आला होता. मात्र हा चित्रपट सगळ्यात वाईट चित्रपट असल्याचे म्हंटले गेले. अशातच आता त्याचा भूमी पेडणेकरबरोबर एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (arjun kapoor new movie)
सतत चर्चेत राहणाऱ्या अर्जुनने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘मेरे हसबंड की बिवी’ असे या चित्रपटाचे नाव असून सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये मोजडी, स्टिलेट्टो व पंजाबी मोजडी दिसून आली. तसेच पोस्टर शेअर करत लिहिले की, “इथे प्रेमाची भूमिती थोडी वेगळी आहे. कारण हा प्रेमाचा त्रिकोण नाही तर वर्तुळ आहे. ‘मेरे हसबंड की बिवी’ चित्रपटगृहांमध्ये २१ फेब्रुवारी २०२५ पासून”.
अर्जुन व भूमी यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच हा चित्रपट फ्लॉप होणार असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “सगळ्यात मोठं संकट येणार आहे. अभिनंदन”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “अजून एक फ्लॉप चित्रपट”, अजून एकाने लिहिले की, “नको करुस. हा चित्रपट तसाही चालणार नाही. चुकीचे कलाकार घेतले आहेत”. त्यानंतर एका नेटकऱ्याने लिहिले की, “अर्जुन कपूरला कोण बघणार?”. त्यामुळे आता अर्जुनच्या चित्रपटाला प्रेक्षक कशी पसंती दर्शवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अर्जुनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन-भूमी यांच्याबरोबरच रकुल प्रीत सिंहदेखील दिसणार आहे. हा चित्रपट जॅकी भगनानी व वासू भगनानी हे निर्मित करत आहेत. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.