बॉलीवूड अभिनेता अन्नु कपूर खूप चर्चेत आहे. आजवर त्यांनी अनेक मालिका व चित्रपटांममध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील केले आहेत. आता त्यांचा ‘हमारे बाराह’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या चित्रपटावरुन वाददेखील झालेले पाहायला मिळाले. यामुळे चित्रपट प्रदर्शनाची तारीखदेखील पुढे ढकलली गेली आहे. मात्र आता ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. चित्रपट प्रमोशन दरम्यान त्यांनी अभिनेत्री कंगना रणौत व चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल भाष्य केले आहे. ( annu kapoor on kangana ranuat and sanjay leela bhansali)
अन्नू यांचा ‘हमारे बाराह’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपटामुळे अनेक वाद देखील निर्माण झाले होते. या चित्रपटामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र आता न्यायालयांकडून या चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला आहे. हा चित्रपट २१ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण अन्नू आता चित्रपटामुळे नाही तर त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले अहेत. त्यांनी कंगना व संजय लीला भन्साळी यांच्यावर भाष्य केले आहे.
#KanganaRanaut थप्पड़ कांड पर #AnnuKapoor ने दिया जवाब… मीडिया ने सवाल पूछा तो कहा- ये कंगना जी कौन हैं, सुंदर हैं क्या? pic.twitter.com/vx6YtBov7C
— NBT Entertainment (@NBTEnt) June 21, 2024
चित्रपट प्रमोशन दरम्यान अन्नू यांना कंगनाला कानशिलात मारल्याबद्दल विचारले त्यावर त्यांनी सांगितले कि, “कोण आहे कंगना? कोणी मोठी अभिनेत्री आहे का? सुंदर आहे?”, त्यावर उपस्थितांनी ती नवनिर्वाचित खासदार आहे असे सांगितले. यावर त्यांना आश्चर्य वाटले आणि म्हणाले की, “अच्छा, तेही झाली का? जर मी काही बोललो तर म्हणतील की अन्नू कपूर फालतू काहीटरी बोलत आहे. पण जर मला कुणी कानशिलात लागावली तर त्यासाठी मी कायद्याचा आधार घेईन”.
इथेच न थांबता अन्नू यांनी संजय लीला भन्साळी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “संजय लीला भन्साळी यांच्या चपलेनेदेखील मारले आहे. त्यांचा धर्मावर विश्वास नाही. भन्साळी यांनी आतापर्यंत हिंदूंचा कधीही आदर केला नाही”. अन्नू यांची ही दोन्ही विधाने खूपच चर्चेत आली आहेत. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.