यंदा अनेक कलाकार मंडळींनी वटपौर्णिमा पूजा अगदी थाटामाटात साजरी केली. अनेक नवविवाहित वधुंनी यंदाची त्यांची पहिली वटपौर्णिमा उत्साहाने साजरी केली. तर काहींनी हा सण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साजरा केला. यंदाच्या या वटपौर्णिमेच्या सणाला सिनेसृष्टीतील अभिनेत्रींच्या लूकची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अशातच अभिनेत्री शरयू सोनावणे हिनेदेखील तिची पहिली वटपौर्णिमा अगदी थाटामाटात पार पडलेली समोर आली आहे. (Sharayu sonawane vatpornima)
‘पारू’ या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. पारू ही व्यक्तिरेखा ती साकारत आहेत. पारू या भूमिकेमुळे शरयूला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. शरयू तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली. कारण लग्नाला थेट १ वर्ष पूर्ण होताच शरयूने तिच्या लग्नाची जाहीर कबुली दिली. त्यामुळे शरयू व जयंतच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्यांच्या लग्नाचे फोटोही बरेच चर्चेत राहिलेले पाहायला मिळाले.

अशातच शरयूच्या वटपौर्णिमेच्या फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये शरयू वटपौर्णिमेनिमित्त तयार झालेली पाहायला मिळत आहे. शरयूने जयंतच्या दीर्घायुष्यासाठी ही खास पूजा केली आहे. यावेळी तिने मोरपिसी रंगाची काठापदराची साडी नेसली आहे. पारूचा कोणताही थाटमाट न करता अगदी साधा सोज्वळ लूक साऱ्यांच्या पसंतीस पडला. वाण घेऊन जात वडाची पूजा करताना पारू खूपच सुंदर दिसत होती. पारूच्या कानातील झुमके, गळ्यात मोत्यांचा हार आणि तिचं मंगळसूत्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
‘पारू’ मालिकेतही सध्या वटपौर्णिमेच्या ट्रॅक सुरु असलेला पाहायला मिळत आहे. किर्लोस्करांच्या सूनांनी वटपौर्णिमेची पूजा केली आहे. तर मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्येही पारू आदित्यच्या आयुष्यासाठी वडाची पूजा करायची आणि उपवास धरायचं ठरवते. आता पारू आदित्यसाठी ही पूजा करणार असल्याचं सत्य सर्वांसमोर येणार का?, हे अद्याप समोर आलेलं नाही. तर इकडे खऱ्या आयुष्यात मात्र पारूने तिच्या पतीसाठी पूजा केली आहे.