बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन खूप चर्चेत आहे. ऐश्वर्या राय बच्चनबरोबर घटस्फोट होणार असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. मात्र त्यांच्या नात्याबद्दल अद्याप अभिषेक व ऐश्वर्या यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही. मात्र दोघांनाही पाठिंबा देण्यासाठी अमिताभ बच्चननेहमी पुढे येतात. नुकतीच एक घटना समोर आली आहे. अभिषेकबरोबर काहीही चुकीचे घडते तेव्हा अमिताभ नेहमी त्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावतात. अनेकदा ते प्रोत्साहन देतानाही दिसतात. अनेक जुने व्हिडीओ अमिताभ शेअर करताना दिसतात. नुकताच त्यांनी एक अभिषेकचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिषेक इंग्रजी बोलताना दिसत आहे. यावरुन सोशल मीडियावर एक चर्चा सुरु आहे. (amitabh bachchan viral comment)
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिषेक म्हणत आहे की, “’आय वॉन्ट टु टॉक’ स्वीकारला कारण यामध्ये काही चुकीचे काही घडल्यानंतरही खुश कसे राहता येईल याबद्दल सांगण्यात आले आहे”. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. तसेच अभिषेकच्या अभिनयाची खूप स्तुतीदेखील करण्यात आली. मात्र या व्हिडीओमध्ये अभिषेकने वापरलेल्या भाषेवर एका नेटकऱ्याने आक्षेप घेतला आहे. तसेच त्याने प्रश्नदेखील केला आहे. या प्रश्नाला अमिताभ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
वाह ! क्या दृष्टिकोण है आपका ! अद्भुत ! बोलने को कहते हो हिन्दी में, और लिखते हो अंग्रेज़ी अक्षरों में ! 🤣 https://t.co/N8cScdFCIt
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 4, 2024
नेटकऱ्याने लिहिले की, “सर ज्युनिअर बच्चनला हिंदीमध्ये बोलण्यास सांगा, इंग्रजी आम्हाला समजत नाही”. नेटकऱ्याने हे सगळं हिंदीमध्ये सांगितलं मात्र हे लिहण्याची भाषा मात्र इंग्रजी होते. त्यामुळे आता यावर अमिताभ यांनी नेटकऱ्याला उत्तर दिले. त्यांनी उत्तर देत लिहिले की, “वाह, काय दृष्टिकोण आहे तुमचा. अद्भुत, हिंदीमध्ये बोलायला सांगता पण लिहिता इंग्रजीमध्ये”. दरम्यान अमिताभ यांच्या उत्तराने नेटकऱ्याची बोलती बंद केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या-अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत आहेत. त्यावर अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ऐश्वर्याच्या वाढदिवशीही अभिषेक आणि बच्चन कुटुंबीयांकडून सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट शेअर केली नव्हती. या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जात आहे