शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझाच शो बंद करेन आणि…”, आंब्याची मस्करी करणाऱ्याला अक्षय कुमारने सुनावलं, म्हणाला, “आंबे मला आवडतात पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 10, 2024 | 7:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
akshay kumar on mangos

"तुझाच शो बंद करेन आणि…", आंब्याची मस्करी करणाऱ्याला अक्षय कुमारने सुनावलं, म्हणाला, "आंबे मला आवडतात पण…"

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘बडे मिया छोटे मिया’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान त्याने एका युट्यूबरला मुलाखत दिली होती. यावेळी २०१९ साली अक्षयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये त्याने नरेंद्र मोदी यांना आंबे आवडतात का? असा प्रश्न विचारला होता. याचबरोबर ते आंबे कसे खातात याबद्दलदेखील विचारले होते. आता याच व्हिडीओचा आधार घेऊन युट्यूबरने अक्षयची मस्करी करण्यास सुरवात केली. यावर अक्षयने त्याला शांत केले आणि त्याच्या प्रतिप्रश्नांचा भडीमार सुरु केला. (akshay kumar on mangos)

अक्षय ‘बियरबायसेप्स’ या युट्यूब चॅनलला मुलाखत देत होता. त्यावेळी त्याची मुलाखत रणवीर अलाहाबादिया घेत होता. या दरम्यान त्याने अक्षयला आंब्यांबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याने विचारले की, “तुम्हाला आंबे आवडतात का?”, त्यावर अक्षयने उत्तर दिले, “कोणला आवडत नाहीत? आपल्या देशातील आंबे खूप चांगले आहेत. हापूस आंबा कोणाला आवडत नाहीत?”, त्यावर त्याच्याबाजूला टायगर श्रॉफ म्हणतो की, “मला आंबे खूप आवडतात”. त्यावर अक्षय रणवीरला म्हणतो की, “तू आंब्याची मस्करी करत आहेस का? आंब्याची मस्करी करु नकोस. जर केलीस तर तुझा पॉडकास्ट शो बंद पडेल”.

आणखी वाचा – Video : रवी जाधव यांच्या बायकोचा Scuba Diving करत पाण्यामध्येच गुलाबी साडीवर भन्नाट डान्स, एकत्र पोझही दिल्या अन्….; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयच्या या बोलण्यावर तिघेही हसू लागतात. तसेच अक्षयने नरेंद्र मोदी यांची मुलाखत का घेतली याचेदेखील उत्तर त्याने एका मुलाखतीमध्ये दिले होते. त्याने सांगितले होते की, “मला त्यांची एक वेगळी बाजू सगळ्यांच्या समोर आणायची होती. माझ्या मनात जो प्रश्न आला तो मी त्यांना विचारला. त्याचप्रमाणे ते घडयाळ उलटे का घालतात? हा प्रश्नदेखील मला जाणून घ्यायचे होते. तसेच त्यांच्या अकाऊंटमध्ये कीटि पैसे आहेत? याबद्दलही जाणून घ्यायचे होते. मी त्याच्या राजकारणातील रणनितींबद्दल विचारण्यासाठी गेलो नव्हतो”.

आणखी वाचा – अंध मुलाची शिकण्यासाठी धडपड, तिरस्कार अन्…; राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’चा प्रेरणादायी ट्रेलर प्रदर्शित, भरत जाधव यांचीही दिसली झलक

दरम्यान त्याची व नरेंद्र मोदी यांची मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. तो अनेकदा भाजप पक्षाला पाठिंबा देताना दिसून येतो. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा ‘बडे मिया छोटे मिया’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये त्याच्याबरोबर टायगर श्रॉफ, मानुषी चिल्लर, अलाया एफ, सोनाक्षी सिन्हा हे कलाकार दिसणार आहेत.   

Tags: akshay kumarchat showinterviewmango love
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Pooja sawant home

प्रशस्त घर, घरासमोर मोठी जागा आणि…; ऑस्ट्रेलियामध्ये असं आहे पूजा सावंतचं सासरकडचं घर, शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.