अभिनेत्री पूजा सावंत हिने आजवर तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. काही दिवसांपासून पूजा विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळाली. ती म्हणजे तिच्या लग्नामुळे. पूजा सावंतच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. पूजा व सिद्धेशने उरकलेल्या बॉलिवूड स्टाईल लग्नाने साऱ्यांच्या नजरा वळविल्या. लग्नाबरोबरच पूजा व सिद्धेशच्या साखरपुडा, हळदी, मेहंदी, संगीत सोहळ्याचीही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. (Pooja sawant home)
पूजा व सिद्धेश लग्नानंतरचे त्यांचे दिवस एन्जॉय करत आहेत. लग्नानंतर काही दिवसांनी पूजा परदेशात गेलेली पाहायला मिळाली. पूजाचा नवरा हा कामानिमित्त ऑस्ट्रेलिया येथे आहे. त्यामुळे लग्नानंतर पूजाही नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला गेली आहे. पूजाचा नवरा ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. त्यामुळे सिद्धेश ऑस्ट्रेलियात राहत असून तो केवळ कामानिमित्त भारतात येतो. अशातच आता पूजादेखील नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये राहत आहे.
पूजाने ऑस्ट्रेलियात लग्नानंतरचा पहिला सण गुढीपाडवा साजरा केला. पूजाने ऑस्ट्रेलियामधील सिद्धेशच्या घरी गुढी उभारलेली पाहायला मिळाली. याचवेळी पूजा व सिद्देश यांच्या ऑस्ट्रेलियाच्या घराची झलक पाहायला मिळाली. पूजाने काही खास फोटो शेअर केले आहेत यांत त्यांचं घर पाहायला मिळत आहे. त्यांच्या घराबाहेरही मोकळी जागा पाहायला मिळत आहे. शिवाय आजूबाजूला झाडे पाहायला मिळत आहेत. शिवाय दरवाज्याला सुंदर असं तोरण लावलेलं पाहायला मिळालं. पूजाने घराच्या दरवाज्यात उभा राहून काढलेल्या फोटोत तिच्या आलिशान व भव्य अशा घराची झलक पाहायला मिळाली.
इतकंच नव्हेतर काल पूजाने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला तिची बहीण रुचिराला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळीही त्यांच्या घराची झलक दिसली. यावेळी सिद्धेश घरातून काम करतानाही दिसला. लग्नानंतर पहिला गुढीपाडवा पूजा व सिद्धेशने ऑस्ट्रेलियात मराठी परंपरेनुसार साजरा केला. यावेळी पूजाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा व गळ्यात मोठ मंगळसूत्र अशा नववधूच्या लूकमध्ये दिसली. तर सिद्धेश कुर्ता पायजमामध्ये दिसला. दोघांचाही पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला.