Akshay Kumar Donate : राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दिवाळीनिमित्त विशेष तयारी करण्यात आली आहे. हजारो लाखो तेलाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले आहेत. त्यामुळे अयोध्या नगरीत प्रकाश पसरलेला पाहायला मिळतोय. या सगळ्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने तेथील माकडांसाठी एक कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याने या रकमेतून माकडांना खायला दिले आहे. भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रभू रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी अभिनेत्याने हे पाऊल उचलल्याचे अहवालात म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माकडांना खायला घालण्याचा उपक्रम अंजनेय सेवा ट्रस्टकडून घेतला जात आहे. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, ट्रस्टचे प्रमुख, जगतगुरु स्वामी राघवाचार्य जी महाराज यांनी अक्षय कुमारला या उदात्त कार्यात सामील होण्यास सांगितले आणि अभिनेत्याने लगेच होकार दिला. ट्रस्टच्या एका सदस्याने असेही सांगितले की, ‘अक्षय त्याचे पालक हरिओम भाटिया आणि अरुणा भाटिया आणि सासरे राजेश खन्ना यांच्या नावाने विविध कारणांसाठी सक्रियपणे देणगी देतो’.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात अभिजीत सावंतला झालेली दुखापत, आता फ्रॅक्चर काढलं अन्…; म्हणाला, “ही बंदूक…”
ट्रस्टचे सदस्य म्हणाले, ‘अक्षय केवळ एक उदार देणगीदार नाही तर तो भारताचा एक सामाजिक जागरुक नागरिक देखील आहे. त्यांना अयोध्येतील नागरिकांची आणि शहरातील नागरिकांची तितकीच काळजी होती आणि त्यामुळे माकडांना खाऊ घालताना कोणत्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही आणि माकडांना खायला दिल्यावर अयोध्येच्या रस्त्यावर कचरा होणार नाही याचीही काळजी घेतली गेली.’
आणखी वाचा – “माझ्या आईच्या साडीने पेट घेतला अन्…”, ‘नवरी मिळे…’ फेम लीलाने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “फटाक्यामुळे…”
अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘सिंघम अगेन’मध्ये तो दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या पोलीस विश्वाचा हा भाग आहे. या चित्रपटात अक्षय त्याच्या ‘सूर्यवंशी’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात अजय देवगण, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान यांचा समावेश आहे. हा चित्रपट १ नोव्हेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे.