मंगळवार, मे 20, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या आईच्या साडीने पेट घेतला अन्…”, ‘नवरी मिळे…’ फेम लीलाने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “फटाक्यामुळे…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 30, 2024 | 11:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla serial fame Leela Actress Vallari Viraj tells a story about bursting firecrackers as a child.

‘नवरी मिळे हिटलरला’ फेम लीला म्हणजेच वल्लरी विराजने शेअर केला लहानपणीचा फटाके फोडतानाचा किस्सा

दिवाळीच्या सणाला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या सण म्हटल्यावर फराळ आणि फटाके या दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात. फटाके फोडणे हे लहान मुलांसह अनेकांना आवडते. मात्र हे फटाके फोडताना काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा मोठा अनर्थही होऊ शकतो. असंच काही झालं होतं ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका फेम अभिनेत्री वल्लरी विराजबरोबर. वल्लरी विराजने लहानपणी फटाके फोडतानाच्या तिच्या अपघताबद्दल सांगितले आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात तिने लहानपणीच्या फटाके फोडताना झालेल्या अपघाताबद्दल सांगितले आहे. तसेच सर्वांना दिवाळीत फटाके फोडताना काळजी घेण्याचे आवाहनदेखील केलं आहे. (Vallari Viraj Diwali Memory

या व्हिडीओमध्ये लीला म्हणजेच वल्लरी विराजने तिच्या या आठवणीबद्दल असं म्हटलं आहे की, “दिवाळीनिमित्त मला माझ्या लहानपणीचा एक किस्सा आठवतो, तो मी तुम्हाला सांगते. लहान असताना आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी फटाके फोडत होतो. तर अनार (पाऊस) फटाका जो त्रिकोणी असतो आणि तो उभाच लावायचा असतो. तेव्हा मोठे सांगत होते, की आम्ही असतानाच तुम्ही फटाके फोडा. एकट्याने फोडू नका. पण आम्ही हट्टाने एकट्यात फटाके फोडायला घेतले. मज्जा म्हणून आम्ही फटाके फोडायला गेलो आणि तो अनार (पाऊस) मी उभा लावण्याऐवजी आडवा लावला. तेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं काय करायचं. तो अनार उभा लावण्याऐवजी आडवा लावला आणि तो फुटला आणि त्यामुळे माझ्या आईची साडी पेटली”.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – मृणाल कुलकर्णींच्या आईचे निधन, भावुक होत म्हणाल्या, “काही व्यक्त होण्याची ताकद नाही पण…”

यापुढे तिने म्हटलं आहे की, “आईच्या साडीने मागून पेट घेतला आणि खूप गोंधळ झाला. कशीतरी ती आग विझवली. नाशिबाने माझ्या आईला काही झालं नाही. फक्त साडीच काय ती जळली”. यापुढे तिने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करत असं म्हटलं आहे की, “यानिमित्ताने मी एवढंच सांगेन, लहान मुलं-मुली फटाके फोडतील. तर काळजीपूर्वक करा आणि मोठे आजूबाजूला असतील तरच फटाके फोडा. माझ्याबरोबर जसा अपघात होता होता राहिला, तसं तुमच्याबाबतीत होऊ नये म्हणून मी हे सांगत आहे”.

आणखी वाचा – “काय दिवे लावणार कुणास ठाऊक?”, पत्नीने कुशल बद्रिकेला चिडवलं, अभिनेताही म्हणाला, “संध्याकाळी…”

दरम्यान, लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी आपल्या अभिनयाने सर्वांचेच मन जिंकत आहे. अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली आहे. त्यामुळे मालिकेची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.    

Tags: marathi actressVallari VirajVallari Viraj Diwali Memory
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Abhijeet Sawant video

'बिग बॉस'च्या घरात अभिजीत सावंतला झालेली दुखापत, आता फ्रॅक्चर काढलं अन्…; म्हणाला, "ही बंदूक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.