बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा सध्या खूप चर्चेत आहे. आजवर त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या सर्व भूमिकांना प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. ‘रेफ्यूजी’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्याने अभिनयाच्या जोरावर स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. मात्र सध्या तो अभिनयामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला आहे. २०१२ साली अभिषेक व ऐश्वर्या राय लग्नबंधनात अडकले. मात्र आता लग्नाच्या १२ वर्षानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे सांगितले जात आहे. (abhishek bachchan on marriage)
नुकताच अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात दोघांच्या नात्यात काहीतरी अडचण असल्याचे सगळ्यांनाच जाणवले. यावेळी ऐश्वर्या व अभिषेक हे वेगवेगळे आले. त्यामुळे त्यांचे संबंध चांगले नसल्याचे म्हणण्यात आले. मात्र बच्चन कुटुंबीय व ऐश्वर्या यांनी या सर्व प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नाही. अशातच त्याचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अभिषेक कार्तिक आर्यन व रणबीर कपूरबरोबर दिसत आहे. यामध्ये तो लग्न करण्यावर दोघांना सल्ला देताना दिसत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अभिषेकने रणबीरला लग्नाचा सल्ला द्यावा असे सांगितले. त्यावर अभिषेकने सांगितले की, “त्याला सल्ल्याची गरज नाही. बघा, याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तो व आलिया एकमेकांवर प्रेम करतात. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. एकमेकांवर प्रेम करणे, सन्मान करणे हे जास्त गरजेचे असते”.
रणबीरने अभिषेकला थांबवलं आणि मस्करीत म्हंटले की लग्न करण्याबद्दल कार्तिकला काय सल्ला देणार? असे विचारलं. त्यावर कार्तिक म्हणाला की, “अभिषेक तर लग्न करुच नकोस असं म्हणत होता”, हे ऐकताच सगळेच जण हसू लागले. त्यावर अभिषेक म्हणाला की, “आमचे विचार एकसारखेच आहेत. आम्ही आमची काळजी स्वतः घेऊ शकतो”. अभिषेकच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ‘किंग’ या चित्रपटामध्ये शाहरुख खान व सुहाना खान यांच्याबरोबर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये तो खलनायक म्हणून दिसणार आहे.