अभिनेता आमिर खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी आमिर व त्याची दुसरी पत्नी किरण राव यांच्या घटस्फोटाच्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. त्यानंतरही आमिर व किरण अनेकदा एकमेकांबरोबर अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्रितपणे दिसून आले होते. ‘लपता लेडीज’ या चित्रपटाच्या निमित्ताने तब्ब ११ वर्षांनी किरण व आमिर यांनी एकत्रितपणे काम केले. अशातच आता आमिरचा मुलगा जुनैद खान एका चित्रपटाच्या निमिताने चर्चेत आला आहे. लवकरच तो मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. (junaid khan weight loss)
जुनैद त्याचा पहिला चित्रपट ‘महाराज’साठी तयारी करताना दिसत आहे. १४ जूनपासून हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी जुनैद त्याच्या फिजिकल फिटनेसवर लक्ष देताना दिसत आहे. त्याची तब्येत पाहून सगळ्यांनीच तोंडात बोटं घातली आहेत.
जुनैदचा हा फिटनेस पाहून तोदेखील वडिलांप्रमाणे शिस्तपप्रिय असल्याचे म्हंटलं जात आहे. दरम्यान त्याच्या आगामी चित्रपटामध्ये तो एका पत्रकाराची भूमिका निभावताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने तब्बल २६ किलो वजनही कमी केले आहे. हे वजन त्याने २ वर्षात कमी केले आहे. जुनैद त्याच्या कामाप्रति खूपच शिस्तप्रिय आहे. जुनैदचे सुरुवातीचे काही फोटो पाहिले तर त्यामध्ये त्याचे वजन अधिक असलेले दिसते. मात्र या दोन वर्षांमध्ये त्याने स्वतःमध्ये खूप बदल केला असल्याचे निदर्शनास येत आहे.
त्याचे वजन कमी झाल्यानंतरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तो खूप बारीक झालेला दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर जयदीप अहलावत, शर्वरी वाघ व शालिनी पांडे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स करत असून सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘महाराज’ हा चित्रपट १८६२ सालच्या महाराजा लिबेल केसवर आधारित आहे.
या चित्रपटामध्ये जुनैदबरोबर अभिनेत्री साई पल्लवी काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचेही शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.