प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करावा लागतो. कधी हे आजार गंभीरही असू शकतात. त्याबद्दल वेळीच कळलं तर त्यावर उपचार करता येतो. पण असे काही आजार आहेत जे दिसून येत नाही. असे आजार व्यक्तीसाठी खूप घातक ठरतात. मानसिक आजार हा त्यातील एक भाग आहे ज्याचा अंदाज आपल्याला येत नाही. बॉलिवूडचा मिस्ट परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खाननेही या आजाराचा सामना करत होती. तिने यातून बाहेर पडण्यासाठी थेरपीची मदत घेतली आहे. इरा याबाबत अनेकदा बोलताना दिसते. आता स्वतः आमिरनेही थेरपी घेत असल्याचा खुलासा केला आहे. (Aamir and ira talk about mental health)
आज ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आमिर व इरा खानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ते दोघेही मानसिक आरोग्याबद्दल बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये आमिर व इरा बोलतात, “गणित शिकण्यासाठी जसं आपण शिक्षकांकडे जातो, केस कापण्यासाठी आपण सलॉनमध्ये जातो, घरी जर प्लंबिंग, फर्निचरचं काम असेल तर आपण त्याच्याकडे जातो ज्यांना ते काम माहित आहे, आजारी असलो तर डॉक्टरकडे जातो. आयुष्यात अशी अनेक कामं आहेत जी आपण स्वतः करु शकत नाही. आपल्याला काही वेळेस दुसऱ्यांची मदत लागते ज्याला ते काम माहित आहे. जी आपण स्वतः करु शकत नाही असे निर्णय आपण खूपच सहजतेने न लाजता घेतो”.
ते पुढे सांगतात, “याचप्रमाणे जेव्हा आपल्याला मानसिक गरज असते तेव्हा याच सहजतेने न लाजता आपण अशा व्यक्तीकडे गेलं पाहिजे जो आपली मदत करु शकेल”. आमिर पुढे स्पष्ट करतो की “मी आणि इरा आम्ही अनेक वर्षांपासून थेरपीचा लाभ घेत आहोत. जर तुम्हाला वाटत आहे की तुम्ही पण मानसिक किंवा कोणत्या दुःखात आहात तर तुम्हीही अशी व्यक्ती शोधा जी प्रोफेशनल आहे, जी तुमची मदत करु शकेल. यात काहीच लाज वाटण्यासारखं नाही. ऑल द बेस्ट”.
हा व्हिडिओ पोस्ट करत इराने हेल्पलाईन क्रमांक आणि इतर माहिती शेअर केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनीही कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.