सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘छावा’, ‘काश्मीर फाईल्स’सारखा सिनेमा कधीच बनवणार नाही, जॉन अब्राहमचं मोठं विधान, नेमकं सत्य काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 12, 2025 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
John Abraham films

'छावा', 'काश्मीर फाईल्स'सारखा सिनेमा कधीच बनवणार नाही, जॉन अब्राहमचं मोठं विधान, नेमकं सत्य काय?

John Abraham films : ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घातला. अनेक वाद होऊनही हा चित्रपट सिनेरसिकांच्या मनात घर करताना दिसला. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात पाहायला मिळाल्या. छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन प्रवास या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण सुप्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम याने चित्रपटाबाबत केलेलं वक्तव्य धक्कादायक होतं. अभिनेत्याने ‘छावा’, ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटासारखे चित्रपटांची निर्मिती करणार का असा सवाल केला असता अभिनेत्याने या प्रश्नाचे उत्तर देत असं म्हटलं की, “मी छावा सिनेमा पाहिलेला नाही”.

जॉन अब्राहमने नुकतीच ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने सेन्सॉरशिपबद्दलही सांगितलं आहे. याबद्दल तो म्हणाला, “आपल्याला सेन्सॉरशिपची गरज आहे पण ती ज्या पद्धतीने हाताळली जात आहे. त्यावर थोडे प्रश्नचिन्ह आहेत. ते आमच्याशी चांगले वागले आहेत, पण मीसुद्धा माझे चित्रपट जबाबदारीने बनवलेत. मी डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचा माणूस नाही. मी राजकारणापासून दूर आहे. अशा चित्रपटांना नफा आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षकपसंती मिळत असतानाही त्याला असे चित्रपट बनवायची इच्छा नसल्याचं त्याने म्हटलं आहे”. अभिनेता म्हणाला, “उजव्या विचारसरणीच्या चित्रपटांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकपसंती मिळत असून मला ही चिंताजनक बाब वाटत आहे”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याचे राहते घर धोक्यात, विनंती करताच मदतीसाठी धावले देवेंद्र फडणवीस, सहकार सचिवांना महत्त्वाचे आदेश दिले आणि…

अभिनेता पुढे म्हणाला, “कारण जेव्हा तुम्ही चित्रपट निर्माता म्हणून स्वतःला प्रश्न विचारता की तुम्ही कोणत्या प्रकारच्या चित्रपटांना पसंती देता, तेव्हा मी व्यावसायिक चित्रपट करणार का की माझं जे म्हणणं आहे ते चित्रपटांतून मांडणार? याची आधी निवड करेल”. ‘छावा’ किंवा ‘द काश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट बनवण्याची कधी इच्छा झाली का असं विचारण्यात येताच तो म्हणाला, “मी ‘छावा’ पाहिलेला नाही, पण मला माहीत आहे की लोकांना तो आवडला आहे आणि मी ‘द काश्मीर फाईल्स’ही पाहिलेला नाही”.

आणखी वाचा – तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित, नेटकऱ्यांच्या असंख्य प्रतिक्रिया, म्हणाले, “जान्हवीची आठवण…”

पुढे तो म्हणाला, “जेव्हा चित्रपट अतिराजकीय वातावरणात लोकांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने बनवले जातात आणि अशा चित्रपटांना प्रेक्षकही मिळतात, तेव्हा ती गोष्ट मला भयावह वाटते. तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले, तर नाही. मला कधीच अशा प्रकारचे चित्रपट बनवण्याचा मोह झाला नाही आणि मी कधीच असे चित्रपट बनवणारही नाही”.

Tags: bollywood movieChhavaJohn Abraham
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Next Post
Prathamesh parab wife post

"लग्नानंतर मंगळसूत्र नाहीच घातलं तर…?", सुप्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी काय म्हणाली, "माझ्यासाठी परंपरेपेक्षा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.