मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित, नेटकऱ्यांच्या असंख्य प्रतिक्रिया, म्हणाले, “जान्हवीची आठवण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 12, 2025 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tejashri pradhan new serial

तेजश्री प्रधानच्या 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित, नेटकऱ्यांच्या असंख्य प्रतिक्रिया, म्हणाले, "जान्हवीची आठवण…"

tejashri pradhan new serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेने प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली. ही मालिका केव्हा सुरु होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली असून अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेते सुबोध भावे यांची मालिकेतील एन्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली. पहिल्यांदाच ही नवी कोरी जोडी टेलिव्हिजनवर महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० वाजता या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला. झी मराठीवर सुरु झालेल्या या मालिकेमध्ये तेजश्रीने स्वानंदी सरपोतदार ही भूमिका साकारली असून, सुबोध समर राजवाडे हे पात्र साकारत आहे.

मालिकेच्या या पहिल्या भागानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी मालिकेचं तोंडभरुन कौतुक केले आहे. स्वानंदी आणि समर या पात्रांबाबत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, स्वानंदी हे पात्र पाहून तेजश्रीच तोंडभरुन कौतुक होत आहे. तिची ही नवी भूमिका पाहून अनेकजण जान्हवीची आठवण आल्याचं म्हणत आहेत. होणार सून मी या घराची या मालिकेत तेजश्रीने साकारलेलं जान्हवी हे पात्र विशेष गाजलं. अखेर आता पुन्हा एकदा तेजश्री नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

आणखी वाचा – त्याने मला हॉटेलच्या रूममध्ये बंद केले आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक वक्तव्य, फक्त काम हवं म्हणून…

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तेजश्रीच्या नव्या मालिकेचा पहिला भाग समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने असे लिहिले आहे की, “खूपच छान आहे मालिका, आज तेजश्रीचा सुरुवातीचा सीन पाहून जान्हवीची आठवण आली. बाकी मालिका छान आहे”. तर आणखी एकाने कमेंट करत म्हटलं की, “खूप मस्त, स्वानंदीचा प्रवास पाहण्यासाठी उत्सुक आहोत”. अनेकांनी ‘खूप छान’, ‘अप्रतिम’, ‘सुपरहिट होणार’ अशाही कमेंट केल्या आहेत. अन्य एकाने लिहिले की, ‘खूप छान होता पहिला भाग. समर आणि स्वानंदी यांचा अभिनय उत्तम’.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ची बबिता सोशल मीडियापासून आहे दूर, कारण सांगत म्हणाली, “गेले १० दिवस हॉस्पिटल…”

तेजश्री-सुबोधने एकेकाळी त्यांच्या वेगवेगळ्या मालिकांमधून टीआरपीच्या बाबतीत टीव्हीवर अधिराज्य गाजवलं. आता या मालिकेत समरची श्रीमंती आणि याउलट स्वानंदीचा साधेपणा अशा दोन बाजू यामध्ये पाहायला मिळणार आहेत.

Tags: marathi serialtejashri pradhanzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Kishor Kadam home threat

सुप्रसिद्ध अभिनेत्याचे राहते घर धोक्यात, विनंती करताच मदतीसाठी धावले देवेंद्र फडणवीस, सहकार सचिवांना महत्त्वाचे आदेश दिले आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.