बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्नानंतर मंगळसूत्र नाहीच घातलं तर…?”, सुप्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी काय म्हणाली, “माझ्यासाठी परंपरेपेक्षा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 12, 2025 | 2:56 pm
in Women
Reading Time: 1 min read
google-news
Prathamesh parab wife post

"लग्नानंतर मंगळसूत्र नाहीच घातलं तर…?", सुप्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी काय म्हणाली, "माझ्यासाठी परंपरेपेक्षा…"

Prathamesh parab wife post : मंगळसूत्र हा सौभाग्यलंकारातील सर्वश्रेष्ठ दागिना आहे. विवाहित स्त्रिया मंगळसूत्र परिधान करतात. मंगळसूत्र का घालावे, कोणी घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आजकाल मंगळसूत्र घालण्यावरुन बऱ्याच चर्चा सोशल मीडियावर सुरु असलेल्या पाहायला मिळतात. बऱ्याच महिला मंगळसूत्र घालण्याला प्राधान्य देतात तर काही महिला हे मंगळसूत्र न घालण्याला प्राधान्य देतात. हिंदू धर्मात तर मंगळसूत्राशिवाय विवाह संपन्न होतं नाही. मंगळसूत्र हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. मंगळसूत्र कायम घालावे असा कुठे नियम नाही. वा असा कोणता कायदाही नाही. ही ज्याची त्याची आवड आहे. ही बाब लक्षात घेता अनेक महिला आपल्या आवडीनुसार मंगळसूत्र घालतात.

मंगळसूत्राचा हा वाद अनेकदा कलाकार अभिनेत्रींमुळे उद्भवताना दिसतो. अनेक महिला कलाकारांनीही यावरुन भाष्य केलेलं पाहायला मिळालं. अनेक अभिनेत्री आजही मंगळसूत्र घालत नाही, वा त्या एखाद्या सणासुदीला मंगळसूत्र घालण्याला प्राधान्य देतात. आजकाल स्त्रिया या बऱ्यापैकी स्वावलंबी झाल्या आहेत, आणि त्यामुळे त्यांचे विचारही स्वतंत्र्य आणि पुढारलेले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य असल्याने अनेक महिला आपली आवड निवडत त्यांना हवा तो दागिना घालण्याला प्राधान्य देतात.

आणखी वाचा – तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित, नेटकऱ्यांच्या असंख्य प्रतिक्रिया, म्हणाले, “जान्हवीची आठवण…”

मंगळसूत्र हे परंपरेपेक्षा जास्त आहे असं म्हणणाऱ्याही अधिक महिला आहेत. त्यांच्यामते मंगळसूत्र गळयात असणं सौभाग्याचं लक्षण मानलं जातं. आणि मंगळसूत्र घालण्यावरुन एका सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीचं वाक्य चर्चेत आलं आहे. हा अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरसह लग्नगाठ बांधली. ही जोडी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळते. अशातच क्षितिजाने ‘चला करुयात गप्पांचं सेशन’ हा सेगमेंट इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसह घेतला.

आणखी वाचा – ‘छावा’, ‘काश्मीर फाईल्स’सारखा सिनेमा कधीच बनवणार नाही, जॉन अब्राहमचं मोठं विधान, नेमकं सत्य काय?

यावेळी अनेकांनी क्षितिजाचं तोंडभरुन कौतुक केलं. क्षितिजाचं कायम मंगळसूत्र गळ्यात असण्यावरून तिचं अनेकांनी कौतुक केलं. एका नेटकऱ्याने या सेशन मध्ये तिला म्हटलं की, “तू गळ्यात मंगळसूत्र घालून कायम दिसतेस. ते खरंतर खूप आवडतं. सध्या स्त्रियांना मंगळसूत्र घालणं म्हणजे लाज वाटते. पण ही आपली परंपरा आहे”. तर आणखी एकाने म्हटले, “मी तुला नेहमीच मंगळसुत्र घालताना पाहिलं आहे आणि हे पाहून नेहमीच आम्हाला तुझं कौतुक वाटतं. बरेचजण आजकाल मंगळसूत्र घालत नाहीत” अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. यावर क्षितिजा घोसाळकरने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “माझ्यासाठी मंगळसूत्र हे परंपरेपेक्षा जास्त आहे, दररोज माझ्या हृदयाजवळ राहणारे त्याचे प्रेम आहे. आपले बंधन, आपला आदर आणि आपली वचने यापुढेही साजरी करण्यासारखी आहेत याची आठवण करुन देणारा हा मोठा पुरावा आहे”.

Tags: entertainmentkshitija ghosalkarprathamesh parab
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Abhinay Kinger battle liver disease

यकृताचा आजार, आर्थिक तंगी आणि…; धनुषबरोबर पदार्पण करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याची वाईट अवस्था, सरकारी मेसच्या जेवणावर…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.