शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सूरज चव्हाण चढणार बोहोल्यावर, कोकणहार्टेड गर्लने शेअर केला पत्नीबरोबरचा फोटो, लवकरच…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 22, 2025 | 10:55 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
suraj chavan wedding

सूरज चव्हाण चढणार बोहोल्यावर, कोकणहार्टेड गर्लने शेअर केला पत्नीबरोबरचा फोटो, लवकरच…

suraj chavan wedding : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ५ चा विजेता सूरज चव्हाणला ‘बिग बॉस’ मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस’ नंतर सूरज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून खऱ्या अर्थाने लोकप्रियतेस आला. सोशल मीडियावर सूरज बऱ्यापैकी सक्रिय असलेला पाहायला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी सूरजने दाक्षिणात्य लूक केलेल्या मुलीसह एक सुंदर असा फोटो शेअर केला होता, त्यानंतर त्याच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरलेला पाहायला मिळाला. यावर अनेकांनी हे लग्न नसून हा त्याच्या नव्या प्रोजेक्टचा भाग असल्याचं म्हटलं आहे. तर सूरजच्या नातेवाईकांनी लग्न ठरल्याची बाब खरी असल्याचं म्हटलं. त्यामुळे अनेकजण संभ्रमात पडले. यानंतर आता थेट सूरजची मानलेली बहीण अंकिता वालावलकरने याबाबत भाष्य केलं आहे.

सूरज चव्हाणच लग्न ठरलं आहे यावर कोकणहार्टेड गर्लने व्हिडीओ शेअर करत शिक्कामोर्तब केला आहे. अंकिता वालावलकरने नुकतीच सूरज चव्हाणची भेट घेतली. त्याला भेटायला तिने बारामती गाठलं. ‘बिग बॉस’च्या घरात सूरज आणि अंकिताच उत्तम बॉण्ड झाला होता. आणि तोच बॉण्ड त्यांनी घराबाहेर आल्यानंतरही कायम राखला. दोघंही एकमेकांना भाऊ-बहीण म्हणत एकमेकांचा आदर करतात. अंकिताने सूरजच्या नव्या घराचीही पाहणी केली.

आणखी वाचा – “जवळच्या व्यक्तीला वेळ देणं…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर पतीची पहिली प्रतिक्रिया, शंतनू मोघे म्हणाला, ” सुख-दुःख खुंटीला टांगून…”

नवं घर बांधण्याचं स्वप्न सूरजच पूर्ण झालं आहे. पण अजून आतील काही काम शिल्लक आहे. व्हिडीओमध्ये अंकिताने सूरजच्या नव्या घराची झलकही दाखविली आहे. याचबरोबर लक्षवेधी बाब म्हणजे अंकिताला सूरजने एका खास व्यक्तीची भेट घडवून दिली. सूरजच्या होणाऱ्या पत्नीची भेट तिने घेतली, आणि तिच्याबरोबरचा फेस हाईड करत एक फोटोही या व्हिडीओमध्ये शेअर केला.

आणखी वाचा – दोन पाणीपुरी कमी दिल्या म्हणून महिलेचा त्रागा, भररस्त्यात थैमान घालत ट्रॅफिक जाम केलं आणि…; व्हिडीओ तुफान व्हायरल

अंकिताने सूरजच्या होणाऱ्या पत्नीसह फोटो शेअर करत या फोटोच्या कॅप्शनमध्ये, “सूरजला खूप खूप शुभेच्छा… लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही सदिच्छा भेट” असं लिहिलं आहे. अंकितानेच सूरजच लग्न ठरलं असल्याची बातमी दिली असल्याने आता चाहतेही यावर विश्वास ठेवत आहेत. सूरज आता ही लग्नाची गोड बातमी कधी देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Tags: ankita walavalkarentertainmentsuraj chavan wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
GharoGhari Matichya Chuli promo

जानकीने ऐश्वर्याला धक्के मारत बाहेर काढलं आणि…; पलटवार की नवा डाव?, 'घरोघरी…' मालिकेत मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.