शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जानकीने ऐश्वर्याला धक्के मारत बाहेर काढलं आणि…; पलटवार की नवा डाव?, ‘घरोघरी…’ मालिकेत मोठा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 22, 2025 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
GharoGhari Matichya Chuli promo

जानकीने ऐश्वर्याला धक्के मारत बाहेर काढलं आणि…; पलटवार की नवा डाव?, 'घरोघरी…' मालिकेत मोठा ट्विस्ट

GharoGhari Matichya Chuli promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. तर सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट येताना पाहायला मिळतात. तसेच आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि ऋषिकेशच्या लग्नाची तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. ऐश्वर्याकडून आईचा पत्ता काढून घेण्यासाठी जानकी हृषिकेश-ऐश्वर्या यांच्या लग्नाला मान्यता देते. शिवाय ऐश्वर्या देखील कट कारस्थान करुन हृषिकेशबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र आता यात एक रंजक वळण येताना पाहायला मिळालं आहे.

सारंगचा मृत्यू झाला आहे असा प्लॅन जानकी व इतर घरातील सदस्य करतात. ऐश्वर्याला जाळ्यात अडकवण्यासाठी हा डाव सगळ्यांनी एकत्र मिळून केलेला असतो. तर नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला, ज्यात ऐश्वर्या व हृषिकेश यांच्या लग्नाच्या वेळी जानकी सारंगला तिच्यासमोर घेऊन येते आणि तिचं हृषिकेशबरोबर लग्न करण्याचा डाव उधळून लावते.

आणखी वाचा – सूरज चव्हाण चढणार बोहोल्यावर, कोकणहार्टेड गर्लने शेअर केला पत्नीबरोबरचा फोटो, लवकरच…

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

समोर आलेल्या प्रोमोमध्ये ऐश्वर्या आणि हृषिकेश लग्नासाठी उभे असतात. मी हृषिकेशची बायको असं ऐश्वर्या मनात म्हणताना दिसते. त्यानंतर अंतरपाट काढल्यानंतर ऐश्वर्या समोर सारंग उभा असलेला दिसतो. तेवढ्यात जानकी, “घाबरू नको सारंग भावोजी फक्त तुला नाही तर आम्हा सगळ्यांना दिसतायत”, असं तिला म्हणते. तर पुढे हृषिकेश म्हणतो, “कारण सारंग जिवंत आहे”. त्यानंतर, “तू आमच्या कुटुंबाला तोडायला आली होतीस ना आता मी तुला तोडणार”, असं जानकी ऐश्वर्याला म्हणते. पुढे जानकी आणि ऐश्वर्या या दोघींमध्ये ही जबरदस्त भांडण होताना पाहायला मिळतं आहे.

आणखी वाचा – “जवळच्या व्यक्तीला वेळ देणं…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर पतीची पहिली प्रतिक्रिया, शंतनू मोघे म्हणाला, ” सुख-दुःख खुंटीला टांगून…”

हा वार माझ्या घरच्यांना तोडण्यासाठी आणि तुला अद्दल शिकवण्यासाठी, असं म्हणत जानकी ऐश्वर्याला घराबाहेर काढते. तर आता पुढे जानकी तिच्या आईचा शोध कसा घेणार आणि ऐश्वर्या आता कोणता नवीन डाव खेळणार तसेच याव्यतिरिक्त आणखी कोणते नवीन ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: gharoghari matichya chuliGharoghari Matichya Chuli Promomarathi malika
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
jui gadkari removed from serial

"ही मुलगी पुन्हा सेटवर दिसायला नको…", जुई गडकरीला मालिकेतून दाखवलेला बाहेरच रस्ता, म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.