शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18च्या घरातून गधराज बाहेर, तर गुणरत्न सदावर्तेंचा घरात तुफान डायलॉगबाजी करत राडा, या आठवड्यात कोण बाहेर पडणार?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 14, 2024 | 12:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss weekend

'बिग बॉस'च्या विकेंड का वारने वेधलं लक्ष

सध्या ‘बिग बॉस’चे १८ वे पर्व खूप चर्चेत आहे. यामध्ये एकूण १८ स्पर्धक सहभागी झाले होते. या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करत आहे. या पर्वाचा पहिला विकेंड नुकताच झाला. यावेळी पहिल्या आठवड्यात चाहत पांडे, मुस्कान बामणे, गुणरत्न सदावर्ते, करणवीर मेहरा व अविनाश मेहरा हे सदस्य नॉमिनेट झाले होते. मात्र यामधील एकही स्पर्धक घराबाहेर गेला नाही. पण यावेळी खूप धमाल झालेलीदेखील दिसून आली. यावेळी ‘लाफ्टर शेफ’चे काही कलाकारदेखील दिसून आले. तसेच ‘विद्या और विकी का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटातील कलाकारदेखील उपस्थित होते. (bigg boss weekend)

यावेळी सलमानने घरातील काही सदस्यांची शाळा घेतली. तसेच सलमानने काही लोकांची स्तुतीदेखील केली आहे. नायरा बॅनर्जीला तिच्या काही चुकादेखील दाखवून दिल्या आहेत. तसेच शिल्पा शिरोडकर यांना सांगितले की ही केवळ सुरुवात आहे पुढचा प्रवास अजून कठीण आहे. तसेच घरातील सडस्यांमध्ये वाद-विवाददेखील पाहायला मिळाले.

आणखी वाचा- कुष्ठरोगी, अनाथ, वृद्धांसाठी जुई गडकरीचा मदतीचा हात, अभिनेत्रीचं कौतुकास्पद काम, व्हिडीओद्वारे म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावेळी ‘बिग बॉस’ च्या सेटवर अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री तृप्ती डीमरी यांनी हजेरी लावली होती. दोघांनीही सलमानच्या गाण्यावर डान्स केला आणि खूप धमालदेखील केली. तसेच राजकुमार व तृप्ती यांची घरातल्या सडस्यांबरोबर ओळखदेखील करुन दिली. यावेळी गुणरत्न यांनी डायलॉगबाजी करुन सगळ्यांचेच मनोरंजन केले.

आणखी वाचा- Bigg Boss Marathi च्या ट्रॉफीनंतर सूरजला हक्काचं घरही मिळणार, अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले, “प्रत्येकाचं स्वप्न असतं की…”

यानंतर भारती सिंह, कृष्णा अभिषेक व सुदेश लहरी यांचीदेखील एंट्री पाहायला मिळाली. तिघांनी मिळून सलमानबरोबर खूप धमालदेखील केली. तसेच सलमानबरोबर जेवणदेखील बनवले. त्याने पराठे बनवले असून सगळं काम स्वतःच केले. सलमानने पराठे एकदम गोल बनवले आहेत. त्याने बनवलेले पराठे सगळ्यांनाच आवडले. तसेच यानंतर कोण घराबाहेर जाणार? याबद्दल सांगितले. यानंतर गधराज घराबाहेर जाणार असून १८ सदस्य मात्र घरातच राहतील हे स्पष्ट केले.  दरम्यान आता हा येता आठवडा कसा राहणार? आणि दुसऱ्या आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags: bigg bossbigg boss season 18weekend ka vaar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Suraj Chavan shared a social media post regarding financial misappropriation with using his name

सूरज चव्हाणच्या नावाचा वापर करत पैसे उकळण्याचा प्रयत्न, स्वतःच उघडकीस आणला प्रकार, म्हणाला, "फेक आयडी बनवून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.