शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 Grand Finale  : मुनव्वर फारुकी ठरला ‘बिग बॉस १७’चा विजेता, वाढदिवशी तमाम भारतीयांकडून मिळालं मोठं बक्षीस, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 29, 2024 | 12:54 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Munawar Faruqui won the Bigg Boss 17 show

बिग बॉस १७ अंतिम विजेता

Bigg Boss Season 17 Grand Finale Updates : छोट्या पडद्यावर गेले अनेक दिवस ज्याची जोरदार चर्चा सुरु होती तो लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस’च्या इतर पर्वांप्रमाणे यंदाचे १७वे पर्व विशेष गाजले. पहिल्या दिवसापासूनच या पर्वाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आणि अखेर ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा आज (२८ जानेवारी) रोजी पार पडला. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाच्या विजेते पदाचा दावेदार कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

अशातच नुकतीच ‘बिग बॉस १७’च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाच्या विजेते पदावर मुनव्वर फारुकीने आपले नाव कोरलं आहे. तर अभिषेक कुमारने दुसरे स्थान पटकावले आहे. ‘बिग बॉस १७’च्या विजेत्याला म्हणजेच मुनव्वर फारुकीला ‘बिग बॉस’च्या आकर्षक ट्रॉफीसह रोख रक्कम ५० लाख रुपये व एक अलिशान कारही बक्षीस म्हणून मिळाली आहे. 

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

हेही वाचा – Bigg Boss 17 Grand Finale : मनारा चोप्राचा प्रवास अखेर संपला, ‘बिग बॉस १७’मधून तिसरी स्पर्धक घराबाहेर, आता अंतिम निकालाची उत्सुकता

या महाअंतिम सोहळ्यात सर्वात आधी अरुण माशेट्टीचा प्रवास संपला. त्या पाठोपाठ या घरातून अंकिता लोखंडे ही स्पर्धक बाहेर पडली. त्यानंतर मनारा चोप्राने या शोला अलविदा केलं. मग दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक कुमारने आपले स्थान कायम ठेवले आणि अखेरीस मुनव्वरने या पर्वाचे विजेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17 Grand Finale : अरुण पाठोपाठ आणखी एक स्पर्धक घराबाहेर, अंकिता लोखंडेचा प्रवास संपला, उर्वरित तीन स्पर्धकांपैकी विजेता कोण?

दरम्यान, ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वरच होणार याचा त्याच्या चाहत्यांना विश्वास होता आणि अखेर चाहत्यांचा हा विश्वास खरा ठरला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे मुनव्वरवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Know the journey of bigg boss 17 winner Munawar Faruqui see the details

पाचवीपर्यंतचे शिक्षण अन् आर्थिक अडचणी…; 'डोंगरीचा मुन्ना' ते 'बिग बॉस १७चा' विजेता, जाणून घ्या मुनव्वर फारुकीच्या एकूण प्रवासाबद्दल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.