टिव्हीवरील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉसच्या’ १७ व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या दोन आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात बरीच भांडण बघायला मिळाली. दुसऱ्या आठवड्यात तर ईशा मालवीय यांचा सध्याचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेल यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. तर समर्थ शोमध्ये येताच ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण बरच बदललं दिसत आहे. या सगळ्यात एकीकडे त्याला पाहून ईशा अचंबित झाली तर दुसरीकडे अभिषेक पुन्हा दुःखी झाला आहे. यादरम्यान अभिषेकने ईशाबद्दल बरेच खुलासे केले. (abhishek kumar revealed isha malviya truth)
ईशाने समर्थला तिचा बॉयफ्रेंड म्हणून स्वीकारल्यानंतर अभिषेकनेही पुढे जाण्यास होकार दिला. घरातील वातावरण थोडं शांत झाल्यावर अभिषेक विकी जैनशी चर्चा करताना दिसला. तेव्हा अभिषेकने सांगितलं, “जेव्हा मी ईशाबरोबर रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा ती प्रत्येक मुलाबरोबर सोशल मिडीयावरून बोलायची. ती गोष्ट मला कधीच आवडली नाही”.अभिषेकने खुलासा करत सांगितलं, “माझ्या आधी एक मुलगा तिच्या आयुष्यात होता. नंतर मी तिच्या आयुष्यात आलो आणि आता हा समर्थ आला”. यावर विकी म्हणाला, “ती सगळ्यांबरोबर एकसारखीच वागते. यामुळेच तिचा सगळ्यांशी त्वरीत संबंध येतो”.
अभिषेक पुढे सांगतो की, “माझ्या मते ईशा सगळ्यांचा वापर करते. मला हे बोलायचं नव्हतं पण मला आता असं वाटायला लागलं आहे की, भविष्यातही समर्थबरोबर काहीतरी वाईट होऊ शकतं. कारण तो या नात्यासाठी बराच गुंतलेला आहे. मी बराच रडलो पण ईशा मात्र अजिबात रडली नाही”.
‘बिग बॉस’च्या घरात आता नवीन समीकरणं निर्माण होत आहेत. भांडणांबरोबर आता नात्यांमध्येही गुंता वाढताना दिसत आहे. आता पुढे ईशा, अभिषेक व समर्थ यांच्या नात्यांमुळे बिग बॉसच्या घरात काय नवी समीकरण निर्माण होतील याबाबत सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. बिग बॉसच्या पुढच्या भागात काय घडतं हे पाहणं रंजक घडेल किंवा नविन कोणतं आश्चर्य बिग बॉसमध्ये प्रवेश करेल याकडे सगळ्यांचच लक्ष लागून आहे.