ओटीटीवरील प्रसिद्ध रिऍलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. या मध्ये व्लॉगर एल्विश यादव विजेता ठरला होता, तर युट्युबर अभिषेक मल्हान म्हणजे ‘फुकरा इन्सान’ उपविजेता ठरला होता. मात्र काही दिवसांपूर्वी अभिषेकची तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते. ज्यामुळे तो घरातील कॉन्सर्टला उपस्थित नव्हता. त्यानंतर शोचा ग्रँड फिनाले पार पडल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल झाला. सध्या अभिषेक रुग्णालयातच असून तिथे त्याच्या चाहत्यांसाठी एक संदेश पाठवला आहे. (bigg boss ott abhishek malhan)
अभिषेक सध्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी 2’च्या ग्रँड फिनालेनंतर अभिषेकने रुग्णालयातून त्याच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ संदेश पाठवला आहे. ज्यात त्याने विजेता एल्विशचे अभिनंदन करताना चाहत्यांचे आभार मानले आहेत. अभिषेक व्हिडिओमध्ये म्हणतो, “सर्वप्रथम ज्यांनी मला वोट केलं, त्यांचे मी आभार मानतो. तुम्हाला माहीतच असेल की, मी बिग बॉसची ट्रॉफी नाही जिंकू शकलो. पण तुम्ही जे प्रेम मला दाखवलं, ते अजूनही दिसत आहे. खरंतर, मी तुम्हा सर्वांच्या प्रेमाइतका पात्रतेचा नव्हतो. पांड्या गॅंगचे व तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो.”
हे देखील वाचा – ‘OMG २’नंतर अक्षय कुमारच्या आणखी एका बड्या चित्रपटाची घोषणा, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का?
अभिषेक पुढे म्हणतो, “मी नुकताच बिग बॉसच्या सेटवरून रुग्णालयात परतलो. मी सर्व प्रसारमाध्यमांची माफी मागतो, की शोबद्दल मला काही मुलाखत देता आली नाही किंवा यावर काही बोलता आलं नाही. पण जेव्हा मी यातून बाहेर पडेन तेव्हा मी खात्री देतो, तुम्हा सर्वांशी यावर व्यक्त होईल. ज्यांनी मला पाठिंबा दिला, त्यांना माहिती आहे की ट्रॉफी नाही जिंकू शकलो. पण या दोन महिन्यात मी माझ्यापरीने बरेच प्रयत्न केले.” असे म्हणत त्याने विजेता एल्विश यादवचे अभिनंदन केले आहे.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान रुग्णालयात दाखल, उपचारादरम्यानचा फोटो केला शेअर, पण नेमकं झालं काय?
तब्बल २ महिने सुरु असलेल्या या शोचे सूत्रसंचालन सलमान खानने केले होते. या शोमध्ये सोशल मीडियावरील काही प्रसिद्ध चेहरे सहभागी झाले होते. एल्विश यादवने ‘बिग बॉस ओटीटी’ची ट्रॉफी व २५ लाख रुपये जिंकले आहे. (bigg boss ott fame abhishek malhan send a message to his fans)