‘बिग बॉस OTT’ फेम हिंदी व मराठी मनोरंजन जगतातील अभिनेता राकेश बापट याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची माहिती खुद्द सोशल मीडियावरून त्याने दिली असली, तरी राकेशला रुग्णालयात दाखल करण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. (raqesh bapat hospitalized)
अभिनेता राकेश बापटने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक स्टोरी शेयर केली आहे. त्यात तो रुग्णालयात उपचार घेताना दिसतोय. स्टोरीमध्ये राकेशने आपला चेहरा दाखवला नसला, तरी हाताला सलाईन लावताना आणि थर्मामीटरचा इमोजी शेयर करत चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. नेमकं कोणत्या कारणामुळे राकेश रुग्णालयात दाखल झाला, हे समजू शकले नसले. मात्र त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहते खूपच काळजीत असून तो लवकर बरा व्हावा, म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे.
या कारणांमुळे येतो राकेश चर्चेत (raqesh bapat hospitalized)
‘सरसेनापती हंबीरराव’ या मराठी चित्रपटात दिसलेला अभिनेता राकेश बापटने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटातून केली. पुढे त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं असून ‘बिग बॉस OTT’ या रिऍलिटी शोमध्ये राकेशची लोकप्रियता वाढली. शोदरम्यान राकेश आणि अभिनेत्री शमिता शेट्टी यांच्यात ओळख होऊन मैत्री झाली, आणि नंतर ते प्रेमाच्या आकंठ बुडाले. त्याची चर्चा जोरदार रंगली होती.
हे देखील वाचा : ‘खतरोंके के खिलाडी १३’ मधून अभिनेत्री अंजुम फाकीह पडली बाहेर, जाणून घ्या काय आहे कारण?
शो संपल्यानंतरही हे दोघे एकमेकांना डेट करत होते, शिवाय ते एका म्युझिक अल्बममध्येही एकत्र दिसले आहे. मात्र काही काळानंतर दोघांनी ब्रेकअप झाल्याची घोषणा करत एकमेकांपासून वेगळे झाले. अभिनेता राकेश बापट सध्या अभिनयाबरोबर मॉडेलिंगमध्ये आपलं नशीब अजमावत आहे. (raqesh bapat hospitalized)