Bigg Boss OTT 4 : ‘बिग बॉस १८’ ची सर्वत्र खूप चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यंदाचं हे पर्व आणि या पर्वातील स्पर्धक विशेष चर्चेत राहिले. करण वीर मेहरा या शोचा विजेता ठरला. तर विवियन डिसेना हा फर्स्ट रनर अप तर रजत दलाल हा सेकंड रनर अप ठरला. या शोचा ग्रँड फिनाले १९ जानेवारीला अगदी दणक्यात संपन्न झाला. ‘बिग बॉस १८’च्या महाअंतिम सोहळ्याने चॅनेलच्या टीआरपी रेटिंगमध्येही खळबळ उडवून दिली. आता ‘बिग बॉस ओटीटी’च्या नव्या सीझनची चर्चा सुरु झाली आहे. ‘बिग बॉस ओटीटी ४’ कधी सुरु होईल?, सलमान खान या सीझनचे सूत्रसंचालन करणार की नाही?, असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत.
ट्रेंडनुसार, ‘बिग बॉस ओटीटी’चा नवीन सीझन टीव्ही सीझन संपल्यानंतर सहा महिन्यांनी सुरु होतो. ‘बिग बॉस ओटीटी ३’ गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु झाला. आता ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या बातमीनुसार, ‘बिग बॉस ओटीटी ४’ जुलै महिन्यात प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या आहेत. ‘बिग बॉस OTT ४’ च्या प्रीमियरच्या तारखेची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’च्या यशस्वी भागानंतर आता ओटीटीच्या नव्या भागासाठी चाहते खूप उत्साही आहेत.
दिव्य अग्रवाल ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या हंगामातील विजेती होती. तर एल्विश यादव दुसर्या सत्रात विजेता ठरला. तिसर्या सत्राचा विजेता साना मकबूल होता. सर्व हंगामांवर खूप चर्चा झाली. ‘बिग बॉस १८’ बद्दल बोलायचे तर, यावेळी पहिल्या दिवसापासून विवियन डिसेना आणि करण वीर मेहरा यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. ‘बिग बॉस’ने विवियनला सुरुवातीपासून लाडके बनवले.
शोच्या सुरुवातीलाच ‘बिग बॉस’ने विवियन टॉप २ मध्ये येणार असल्याचे सांगितले होते. विवियन आणि करण वीरने मित्र म्हणून शोमध्ये प्रवेश केला होता. पण हळूहळू त्यांच्यात मारामारी होऊ लागली. आणि कालांतराने दोघांमध्ये मतभेद झाले.