Remo-DSouza Reached Maha Kumbh 2025 : महाकुंभ २०२५ साठी देश-विदेशातून भाविक येत आहेत. अनेकांनी या संगमात स्नान केले आहे. अलीकडेच, क्रिकेटर सुरेश रैना, गायक गुरू रंधावा, अभिनेते अनुपम खेर यांसारख्या अनेक बड्या व्यक्तींनी संगममध्ये श्रद्धेने स्नान केले होते. दरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझाही शनिवारी महाकुंभला पोहोचला. रेमो डिसूझानेही इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये हात जोडलेले दिसत असून त्याबरोबर हार्ट इमोजी जोडले आहे. पण व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येत आहे की, रेमोने स्वतःचा चेहरा काळ्या कपड्याने झाकला आहे. ज्यामुळे त्याला ओळखणे कठीण झाले आहे.
याचदरम्यान संगमच्या जवळून जात असताना एका महिलेने त्याला ओळखले. त्या महिलेने रेमो डिसूजाला थांबविण्याचा प्रयत्न केला पण तो पुढे निघून गेला. यानंतर, रेमोचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शनिवारी रेमो डिसुजा आपली पत्नी लिजेल आणि मुलांसह संगम शहरात पोहोचले. या दरम्यान, त्याने संगममध्ये स्नान केले. तसेच बोटीने संगममध्ये फेरफटकाही मारला. इतकंच नव्हे तर त्यांनी पक्ष्यांना खायलाही दिले.
यानंतर, रेमो डिसूजा स्वामी कैलाशानंद गिरी महाराज यांनाही भेटायला गेले. त्याने प्रवचनही ऐकले. रेमोने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो लक्ष केंद्रित करताना आणि आध्यात्मिक अनुभव घेताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येत आहे की, रेमो महाकुंभ परिसरात काळ्या कपड्यांमध्ये चालत आहे, त्याच्या खांद्यावर पिशव्या लटकत आहे आणि आपला चेहरा काळ्या शालने लपवत आहे.
यावेळी रेमोने माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला, “भोलेनाथ आणि माझे चाहते नेहमीच माझ्याबरोबर असतात म्हणून मला कशाचीही भीती वाटत नाही. माझ्या बरोबर काहीही चुकीचे होणार नाही”. महत्त्वाचे म्हणजे, काही दिवसांपूर्वी रेमोला मृत्यूची धमकी देण्यात आली होती. यावर मीडिया कर्मचार्यांनी त्याला प्रश्न विचारला.