Bigg Boss Ott 3 Winner : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सना मकबूलने रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ च्या ट्रॉफीवर नाव कोरले. सना या पर्वाची विजेती ठरली आहे. शुक्रवार, २ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये, होस्ट अनिल कपूरने सनाचा हात वर करत तिला विजेता घोषित केले. ट्रॉफीबरोबरच सनाने २५ लाखांचे बक्षीसही जिंकले आहे. रॅपर नेजीवर मात करत तिने हा विजय मिळवला. नेजी व्यतिरिक्त रणवीर शौरी, साई केतन राव आणि कृतिका मलिक हे देखील विजेते होण्याच्या शर्यतीत होते.
‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये, सना मकबुल सुरुवातीपासूनच असे म्हणताना दिसली की, ती ट्रॉफी जिंकण्यासाठी आली आहे आणि त्यासाठी ती काहीही करु शकते. शेवटपर्यंत शो जिंकण्याची तिची लगबग यावेळी दिसून आली. ‘बिग बॉस’नेही तिचे कौतुक केले आणि प्रेक्षकांना तिचा स्वभाव व खेळ आवडला असल्याचे सांगितले. या प्रवासात तिने अनेकांशी मैत्रीही केली आणि नातेसंबंधही जपले.
रणवीर शौरी, साई केतन राव आणि कृतिका मलिक या तीन टॉप-५ स्पर्धकांना ग्रँड फिनालेमधून बाहेर काढल्यानंतर, बिग बॉसने १० मिनिटांसाठी व्होटिंग लाइन उघडली जेणेकरुन प्रेक्षक त्यांच्या आवडत्या सदस्याला मतदान करु शकतील. सना यांनी अधिक मते मिळवून नेजी यांचा पराभव केला. सना मकबूल व रॅपर नेझी या पर्वात मित्र राहिले. असे अनेक प्रसंग आले जेव्हा सनाने नेजींना समजावून सांगितले की, त्यांची चूक होती. इतक्या स्पर्धकांमध्ये नेजीने फक्त सना हिचे म्हणणे ऐकले. यामुळेच आता त्यांच्या मैत्रीचे उदाहरण दिले जात आहे.
आणखी वाचा – नवऱ्याने गर्लफ्रेंडला मिठी मारताच भडकली दलजीत कौर, पोस्टही केली शेअर, म्हणाला, “रडू थांबतच नाही कारण…”
ग्रँड फिनालेमध्ये, शो जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर पडणाऱ्या टॉप- ५ स्पर्धकांमध्ये कृतिका मलिक पहिली होती जिने तिचा पती अरमान आणि सवत पायल यांना धक्का दिला. कृतिकानंतर सई केतन राव आणि नंतर रणवीर शौरीही बेघर झाले. याशिवाय राजकुमार राव व श्रद्धा कपूर यांनी ग्रँड फिनालेमध्ये त्यांच्या ‘स्त्री 2’ चित्रपटाचे प्रमोशन केले.