रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्याने गर्लफ्रेंडला मिठी मारताच भडकली दलजीत कौर, पोस्टही केली शेअर, म्हणाला, “रडू थांबतच नाही कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 2, 2024 | 6:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
dalljiet kaur reacts on husband nikhil patel

दलजीत कौरच्या नवऱ्याला गर्लफ्रेंडबरोबर मुंबईत पाहून अभिनेत्रीला कोसळलं रडू

टेलिव्हिजन अभिनेत्री दलजीत कौर पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. निखिल पटेलबरोबरच्या वैवाहिक आयुष्यामुळे ती गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होती. त्यांनतर दोघांनी हे नातं संपवलं असून दोघेही वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचवेळी अभिनेत्रीने निखिल पटेलवर फसवणुकीचा आरोप केला होता, तर निखिल पटेलनेही स्वतःचा बचाव करत अभिनेत्रीने केलेला दावा खोटा असल्याचं म्हटलं होतं. यानंतर आता निखिल त्याच्या कथित मैत्रिणीसह मुंबईला पोहोचला, ज्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. ही पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या वेदना व्यक्त केल्या आहेत. (dalljiet kaur reacts on nikhil patel)

‘टेली टॉक’ने एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये निखिल पटेल त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर दिसत होता. त्याच्या पोस्टनुसार या महिलेचे नाव सफिना नजर आहे. निखिल पटेल १ ऑगस्ट २०२४ रोजी त्याची गर्लफ्रेंड सफिना नजरबरोबर फिरायला मुंबईत आला आहे. या फोटो व व्हिडीओमध्ये निखिल व सफीना मिठी मारताना दिसत होते. दलजीतने इन्स्टास्टोरीवर ही पोस्ट शेअर करत लिहिले, “कोणतेही शब्द नाहीत, फक्त अश्रू आहेत जे थांबत नाहीत”. हा फोटो व्हायरल होताच लोक निखिलवर टीका करत आहेत आणि त्याला ट्रोल करत आहेत. तर निखिलच्या या वागणुकीवर अनेकजण दलजितला पाठिंबा देत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “बाप मेला तेव्हा गोट्या खेळत होतो आणि…”, वडिलांचं निधन होऊनही रडला नाही सूरज चव्हाण, म्हणाला, “गावातल्यांनी नावं ठेवली…”

दलजीत कौर भावुक पोस्ट

दलजीत कौरने २०२३ मध्ये केनियातील बिझनेसमन निखिल पटेलसह दुसरे लग्न केले होते. लग्नाच्या १० महिन्यांनंतरच ही अभिनेत्री भारतात परतली आणि त्यानंतरच या दोघांचे लग्न मोडल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. अभिनेत्रीने निखिलवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला होता. अशा परिस्थितीत हे फोटो समोर आल्यानंतर याची पुष्टी झाली आहे. यावर निखिलकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्या खेळत आहेत आणि…”, वर्षा उसगांवकरांचा मेकअप करताना फोटो शेअर करत मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “फक्त तोंड बघा…”

दरम्यान, दलजीतचं वैयक्तिक आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेलं होतं. तिचं पहिलं लग्न अभिनेता शालिन भनोटशी झालं होतं, पण काही वर्षात ते दोघेही विभक्त झाले. त्यांना जेडन नावाचा एक मुलगा आहे. त्यानंतर तिची व निखिलची भेट झाली व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. निखिलही घटस्फोटित असून त्याला दोन मुली आहेत. आता निखिलच्या या वागणुकीनंतर अनेकजण त्याला दोषी ठरवताना दिसत आहेत.

Tags: dalljiet kaurdalljiet kaur reacts on nikhil patelnikhil patel girlfriend
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
bigg boss marathi season 5 fame dhananjay powar lifestyle and business

Bigg Boss Marathi : कोल्हापूरचा धनंजय पोवार फक्त रिलस्टार नव्हे तर आहे प्रसिद्ध व्यावसायिक, घरही आहे फारच सुंदर, पाहा Inside Videos

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.