शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Ott ची विनर ठरली सना मकबूल, ट्रॉफीसह मिळाली तब्बल इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 3, 2024 | 9:12 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Ott 3 Winner sana makbul

'बिग बॉस ओटीटी ३' च्या ट्रॉफीवर सना मकबूलने कोरलं नाव, रॅपर नेझीवर मात करत जिंकले २५ लाख रुपयांची रोख रक्कम

Bigg Boss Ott 3 Winner : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सना मकबूलने रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ च्या ट्रॉफीवर नाव कोरले. सना या पर्वाची विजेती ठरली आहे. शुक्रवार, २ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये, होस्ट अनिल कपूरने सनाचा हात वर करत तिला विजेता घोषित केले. ट्रॉफीबरोबरच सनाने २५ लाखांचे बक्षीसही जिंकले आहे. रॅपर नेजीवर मात करत तिने हा विजय मिळवला. नेजी व्यतिरिक्त रणवीर शौरी, साई केतन राव आणि कृतिका मलिक हे देखील विजेते होण्याच्या शर्यतीत होते.

‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये, सना मकबुल सुरुवातीपासूनच असे म्हणताना दिसली की, ती ट्रॉफी जिंकण्यासाठी आली आहे आणि त्यासाठी ती काहीही करु शकते. शेवटपर्यंत शो जिंकण्याची तिची लगबग यावेळी दिसून आली. ‘बिग बॉस’नेही तिचे कौतुक केले आणि प्रेक्षकांना तिचा स्वभाव व खेळ आवडला असल्याचे सांगितले. या प्रवासात तिने अनेकांशी मैत्रीही केली आणि नातेसंबंधही जपले.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : कोल्हापूरचा धनंजय पवार फक्त रिलस्टार नव्हे तर आहे प्रसिद्ध व्यावसायिक, घरही आहे फारच सुंदर, पाहा Inside Videos

View this post on Instagram

A post shared by Sana Makbul (@divasana)

रणवीर शौरी, साई केतन राव आणि कृतिका मलिक या तीन टॉप-५ स्पर्धकांना ग्रँड फिनालेमधून बाहेर काढल्यानंतर, बिग बॉसने १० मिनिटांसाठी व्होटिंग लाइन उघडली जेणेकरुन प्रेक्षक त्यांच्या आवडत्या सदस्याला मतदान करु शकतील. सना यांनी अधिक मते मिळवून नेजी यांचा पराभव केला. सना मकबूल व रॅपर नेझी या पर्वात मित्र राहिले. असे अनेक प्रसंग आले जेव्हा सनाने नेजींना समजावून सांगितले की, त्यांची चूक होती. इतक्या स्पर्धकांमध्ये नेजीने फक्त सना हिचे म्हणणे ऐकले. यामुळेच आता त्यांच्या मैत्रीचे उदाहरण दिले जात आहे.

आणखी वाचा – नवऱ्याने गर्लफ्रेंडला मिठी मारताच भडकली दलजीत कौर, पोस्टही केली शेअर, म्हणाला, “रडू थांबतच नाही कारण…”

ग्रँड फिनालेमध्ये, शो जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर पडणाऱ्या टॉप- ५ स्पर्धकांमध्ये कृतिका मलिक पहिली होती जिने तिचा पती अरमान आणि सवत पायल यांना धक्का दिला. कृतिकानंतर सई केतन राव आणि नंतर रणवीर शौरीही बेघर झाले. याशिवाय राजकुमार राव व श्रद्धा कपूर यांनी ग्रँड फिनालेमध्ये त्यांच्या ‘स्त्री 2’ चित्रपटाचे प्रमोशन केले.

Tags: Bigg Boss OTT 3Bigg Boss Ott 3 WinnerBigg Boss Ott 3 Winner sana makbul
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
bigg boss marathi season 5 varsha and nikki fight

Bigg Boss Marathi : "एकमेकांची चाटत बसा आणि…", वर्षा ताईंना बोलताना पुन्हा एकदा निक्की तांबोळीची जीभ घसरली, म्हणाली, "कानात बोटं घालून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.