एकीकडे ‘बिग बॉस मराठी’चा नवीन सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामुळे उत्सुकता लागून राहिली आहे तर, दुसरीकडे ‘बिग बॉस ओटीटी ३’चीदेखील चांगलीच चर्चा सुरु आहे. बिग बॉस ओटीटी ३ची महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार असून आता यात अंतिम लढतीसाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आशातच या घरातील शिवानी कुमारीचा प्रवास संपला आहे. विशाल पांडेच्या आधी शिवानी कुमारीला ‘बिग बॉस OTT 3’ मधून बाहेर काढण्यात आले होते. बाहेर आल्यावर तिने एक व्लॉग बनवला आणि त्यात चाहत्यांशी संवाद साधला. कुटुंबियांबरोबर व्हिडिओ कॉल करताना तिला अश्रुही अनावर झाले. यावेळी आईला पाहताच ती खूपच भावुक झाली.
शिवानीच्या या व्लॉगमध्ये तिने अरमान मलिक आणि निर्मात्यांवर आरोप केले आहेत. शिवानी कुमारीने हा व्लॉग तिच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. त्यात ती हॉटेलच्या खोलीत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘मित्रांनो, मला आत्ताच कळलं की विशालही बाहेर आला आहे. मी बाहेर आल्यानंतर २ तासांनी त्यालाही काढण्यात आलं. आता खेळात काय उरले आहे? असा घाणेरडा खेळ ते खेळत आहेत. मी पण बाहेर आले आणि आता विशालही बाहेर आला आहे”.
यापुढे तिने असं म्हटलं की, “घरात अनेक कारस्थानं रचली जातात. अरमानने सर्वांना त्याच्या बाजूने केलं आहे. मी चांगली खेळत असूनही सर्व काही निरुपयोगी ठरले. जे विजेते आहेत, ज्यांना खरोखर ट्रॉफी हवी असते, ज्यांना ट्रॉफी हवी आहे, त्यांना ट्रॉफी दिली जात नाही. खूप कष्ट करावे लागले. मी खूप छान करत होते. गटाला तोडण्यासाठी असे कारस्थान रचले गेले. अशी कार्ये तयार केली गेली ज्यामुळे त्यांच्यात तेढ निर्माण होईल. दोन दिवस माझा मूड खराब होता”.
आणखी वाचा – “आमचं ठरलंय” म्हणत अक्षया देवधरने सांगितली गुडन्यूज, खास पोस्टही शेअर केली अन्…; म्हणाली, “लवकरच…”
दरम्यान, या व्लॉगमध्ये आईशी बोलताना शिवानी कुमारी खूपच भावुक झाली. व्हिडिओ कॉलवर बोलताना ती म्हणाली, “बिग बॉसने माझ्याबरोबर खूप चुकीचं केलं. मला काढून टाकले. चांगल्या लोकांना बाहेर टाकले जाते आणि वाईट लोकांना आत ठेवले जाते. फायनलला पाच दिवस बाकी होते, मी जिंकलेच होते”.