शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाई भेटायला आल्या आणि…”, अमेरिकेत शाळेतल्या शिक्षिका भेटताच ‘अशी’ होती संकर्षणची प्रतिक्रिया, म्हणाला, “माझ्या परभणीतल्या शाळेत…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 28, 2024 | 12:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor Sankarshan Karhade shared a special post about his teacher visiting him in America and giving him a prize.

"बाई भेटायला आल्या आणि...", अमेरिकेत शाळेतल्या शिक्षिका भेटताच ‘अशी’ होती संकर्षणची प्रतिक्रिया, म्हणाला, "माझ्या परभणीतल्या शाळेत..."

एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कवी, एक उत्तम निवेदक,एक  उत्तम दिग्दर्शक व एक उत्तम माणूस म्हणून मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असलेला कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणच्या अभिनयासह, त्याच्या लिखाणाचे, दिग्दर्शनाचे आणि त्याच्या कवितांचे अनेक चाहते आहेत. संकर्षण त्याच्या अभिनय, लिखाण व सादरीकरणामुळे जितका ओळखला जातो. तितकाच तो त्याच्या कवितांसाठीही ओळखला जातो. अभिनेत्री स्पृहा जोशीबरोबर तो कवितांचे कार्यक्रम करत असतो. त्यांचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आहे. याच कार्यक्रमानिमित्त संकर्षण परदेशात गेला असून परदेशात त्याला त्याच्या शाळेतील शिक्षिका भेटल्या. याचनिमित्ताने संकर्षणने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे आणि हा खास फोटो शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या शाळेच्या “मराठीच्या बाईंनी मला बक्षीस दिलं हो… माझ्या परभणीतल्या शाळेत मला मराठी शिकवायला ह्याच जपे बाई होत्या. नेहमी मला वर्गात उठवायच्या आणि “कऱ्हाडे धडा वाच, कऱ्हाडे, अक्षर अतिशय घाण आहे. तुझं ऱ्हस्वं दीर्घ कधी सूधरणार? असं म्हणायच्या”. पोरांना शिकायचा कंटाळा आला (जो नेहमीच आलेला असायचा) की, “कऱ्हाडे गाणं म्हण” असं म्हणायच्या. आज त्याच माझ्या मराठीच्या बाई कवितांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत आल्या आणि मला कवितांसांठी बक्षीस दिलं”.

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

आणखी वाचा – Video : लग्नाला पाच महीने पूर्ण होताच प्रथमेश परबने बायकोला दिल ‘हे’ खास सरप्राईज, मुंबई-पुणेऐवजी ‘या’ ठिकाणी केलं जंगी सेलिब्रेशन

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “यामुळे मला खूप भरुन आलं. प्रेक्षकांना भेटतांना तसा मी शांत ऊभा असतो पण, बाई भेटायला आल्या आणि मला खरंच भिती वाटली. माझी आज शब्दांशी ‘जर मैत्री असेल’ तर ती बाईंनीच करून दिली आहे. हे नातं तेव्हाचं आहे, जेंव्हा शाळेतल्या बाईंना “बाईच” म्हणायचो. समजा शाळेतले गुरूजी भाजी मंडईत जरी दिसले तरी भिती वाटायची आणि घाबरून चालत्या सायकल वरून ऊडी मारायचो“.

आणखी वाचा – आधुनिकतेला पारंपरिकतेचा साज, अगदी प्रशस्त आणि भव्य आहे ‘बिग बॉस मराठी’चं नवीन घर, पाहा संपूर्ण Video

यापुढे त्याने भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “अभ्यासात मी कधीच हूशार नव्हतो. त्यामुळे तेव्हा बक्षीस मिळवून घरी पळत जाउन आई-बाबांना ते आनंदाने सांगण्याचं सुख कधी मिळालं नाही. पण आज सांगतो आई-बाबांना, बायको आणि माझ्या छोट्या मुलांनाही की “माझ्या बाईंनी मला बक्षीस दिलं”. दरम्यान, संकर्षणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून अनेकांनी या पोस्टखाली कमेंट्सद्वारे त्याचे कौतुक केलं आहे. “खूप खूप अभिनंदन, किती गोड योगायोग, संकर्षण, हे खरं बक्षीस आहे, तुम्ही अप्रतीम काम करत आहात, हीच ती गुरु शिष्य भेट” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी संकर्षणचे कौतुक केलं आहे.

Tags: marathi actormarathi entertainment newssankarshan karhade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Tuzyat Jiv Rangala fame Akshaya Deodhar shared a special video on social media saying that she is starting her new journey.

“आमचं ठरलंय” म्हणत अक्षया देवधरने सांगितली गुडन्यूज, खास पोस्टही शेअर केली अन्...; म्हणाली, “लवकरच...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.