Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या विजेतेपदाचा बहुमान रील स्टार सूरज चव्हाणने पटकावला. संबंध महाराष्ट्रातून सूरजला भरभरुन पाठिंबा मिळत होता आणि अखेर विजयी पदावरही सूरजचं नाव आलं. बारामतीच्या सूरज चव्हाणचा विजय झाल्यानंतर आता तो ट्रॉफीसह त्याच्या गावी पोहोचला आहे. गावी जाताना सूरजने जेजुरीचे दर्शन घेतले. मोडवे गावात पोहोचताच त्याचं गुलाल उधळत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करत सूरजने त्याचं नाव उंचावलं आहे. सूरजला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांची गर्दी उसळली आहे. सोशल मिडियावर सूरजच्या स्वागताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.
अशातच सूरजच्या विजयानंतर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये गावी गेल्यावर त्याची भेट त्याच्या मैत्रिणीशी झालेली पाहायला मिळत आहे. सूरजचा त्याच्या मैत्रिणीबरोबरचा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. सूरजच्या या मैत्रिणीचं नाव काजल शिंदे असं आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – लेकाचा हात धरुन काजोल आली दुर्गा पंडालला, नेटकऱ्यांना आवडला माय-लेकाचा खास बॉण्ड, म्हणाले, “ही जोडी…”
या व्हिडीओमध्ये काजल सूरजला विचारताना दिसत आहे की, “विसरलाय होय मला”. त्यावर सूरज नकार देतो आणि “तू माझी हिरोईन आहेस”, असं तो काजलला बोलतो. त्यावर काजल सूरजला म्हणते, “मला वाटलं की तू मला विसरलास”. तितक्यात निक्की त्याची बहीण आहे असं कोणतरी बोलतं. त्यानंतर काजल सूरजचं अभिनंदन करते आणि असाच आयुष्यात पुढे जा असं म्हणत त्याचं कौतुक करते.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : दिशामुळे पारूच्या जीवाला धोका, आबासाहेब प्रियाला घेऊन अहिल्यासमोर येणार का?
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. सूरज व काजलला एकत्र पाहून नेटकरी त्यांना लग्न करण्याचा सल्ला देत आहेत. “सूरज हीच ती आमची वहिनी शोभेल, तुला खरंच जिवापाड जपेल”, “सूरज वेळ लावू नको करुन टाक लग्न”, “खरं तर सूरजला आता जो सिनेमा मिळाला त्यात काजल हिरोईन पाहिजे. दोन्हीपण कॅरॅक्टर जबरदस्त आहेत”, “काजल सूरजबरोबर लग्न कर त्याला तुझा आधार मिळेल”, “तू अजून पुढे जा आणि जाताना तिला पण घेऊन जा”, “सूरज हीच बायको म्हणून शोभेल तुला आणि सांभाळेल”, अशा अनेक कमेंट केल्या आहेत.