‘बिग बॉस मराठी’चं घर म्हटलं की १०० दिवसांचा प्रवास आला. मात्र ‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं हे पाचवं पर्व १०० दिवसांचं नसून ते ७० दिवसांच असणार असल्याचं काही दिवसांपूर्वी घोषित करण्यात आलं. या घरात जाणाऱ्या स्पर्धकांना भावनिक बाजू सांभाळत या घरातील त्यांचा प्रवास हा पूर्ण करावा लागतो. कुटुंबापासून दूर राहत, कोणताही संपर्क न करता हा मोठा पल्ला त्यांना गाठायचा असतो. इतर वेळी ही कलाकार मंडळी चित्रीकरणानिमित्त घरापासून दूर असली तरी ती त्यांच्या संपर्कात असतात. मात्र इथे त्यांचा घरातील कुटुंब घरातील माणसांशी कोणताच संबंध नसताना त्यांच्या शिवाय हे दिवस काढायचे असतात. त्यामुळे अर्थातच हा प्रवास काही सोपा नसतो. (Bigg Boss Marathi Season 5)
अशातच यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात एका विनोदवीराने साऱ्यांना मजा आणली. आपल्या कॉमेडीने त्यानं साऱ्यांना भुरळ घातलेली पाहायला मिळाली हा अभिनेता पॅडी कांबळे होय. विनोदवीर पॅडी कांबळे याने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं असलं तरी ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर त्याच्यातील त्याची कमकुवत बाजू ही समोर आली आहे आणि तो त्याच्या मुलींसाठी नेहमीच भावुक होतानाही दिसला इतकंच नव्हे तर तो कुटुंबासाठीही भावुक झालेला पाहायला मिळाला. आज पॅडी कांबळे अगदी पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरात तक धरुन बसला आहे आणि आता ट्रॉफीपर्यंतचा त्याचा प्रवास पूर्ण होताना पाहायला मिळतोय.
आणखी वाचा – आधी आई अन् आता राखी सावंतकडून अरबाजच्या साखरपुड्याची बातमी समोर, निक्कीला काही सुचेना, म्हणाली, “तो समोर…”
हे पाहून त्याची सिने विश्वातील जवळची मैत्रीण विशाखा सुभेदार यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. विशाखा सुभेदार यांनी यापूर्वीही पॅडी कांबळेला भरभरुन पाठिंबा देताना दिसल्या. शिवाय पॅडीचा ‘बिग बॉस’च्या घरात झालेल्या अपमानावरही विशाखा सुभेदार यांनी साडेतोडपणे भाष्य केलेल दिसलं. आता यानंतर विशाखा सुभेदार यांनी या कठीण प्रवासाचं वर्णन करत पॅडी बाबत काळजी व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे आणि शेवटच्या आठवड्यात या उमेदवाराला मतदान देऊन त्याचा पुढील प्रवास सोयीस्कर करावा अशी विनंती ही प्रेक्षकांना केलेली पाहायला मिळतेय.
विशाखा यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “मनात अनेक प्रश्न असतील त्याच्या, या सगळ्यांच्याच खरंतर. घरात सगळं कसं सुरु आहे. मुलं शाळेत जातायत का?, घर खर्च सगळा नीट जमतोय का?, याची काळजी असेलच. हे सगळं सांभाळून डोक्यात ठेवून ‘बिग बॉस’च्या घराची तारेवरची कसरत करत पॅडी स्वतःच माणुसपण जपत प्रामाणिकपणे खेळत आहे. ते सुद्धा उद्धट न बोलता, हाणामारी न करता, सांभाळून खेळतोय. हा पण त्याची जर खोडी काढली, कामं जर नाही केली तर तोंडाचा पट्टा देखील चालवतोय. खेचा खेची करत माहौल कधी गरम तर कधी नरम, कधी खुमासदार, तर कधी शांत कधी प्रेमळ, कधी समजुतदार ठेवतोय. जसा तो बाहेरच्या जगात आहे तसाच आतल्या बंद जिवंत घरात. आपला paddy म्हणजेच पंढरीनाथ कांबळे आता top 5 च्या दिशेने प्रवास करतोय, त्या ठिकाणी तुम्हीच त्याला पोचवू शकता. मंडळी त्याचा प्रवास असाच पुढे रहावा म्हणून त्याला भरभरुन वोट दया”, अशी विनंतीही केली आहे.