Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात निक्की तांबोळीच्या एंट्रीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. अगदी पहिल्या दिवसापासून निक्की स्पर्धकांशी घरात वाद घालताना दिसली. निक्कीचा अरेरावीपणा पाहून अनेकदा तिला ट्रोलही करण्यात आलं. मात्र उत्तम गेम खेळत स्पर्धकांना सडेतोड उत्तर देताना ती दिसली. अशातच आता ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाचे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. शेवटचा आठवडा शिल्लक राहिला असून आता यंदाच हे ‘बिग बॉस’चं पर्व १०० दिवसांचं नसून ७० दिवसांच असणार असल्याचं जाहीर झालं आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंतचा ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांचा प्रवास सुरु झालेला पाहायला मिळतोय.
अशातच शेवटच्या दिवसातही निक्कीने स्पर्धकांशी वाद घालणं काही सोडलं नसल्याचे दिसतंय. तसेच ती त्यांना टोमणे देतानाही दिसते. ‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोने साऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. या प्रोमोमध्ये निक्की व अंकिता यांचं वाजलं असल्याचं दिसतंय. अंकिता नेहमी सूरजला सल्ले देताना दिसली ही गोष्ट साऱ्यांनाच खटकलेली पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा अंकिताने सूरजला दिलेला सल्ला ऐकून निक्कीने अंकिताला चांगलचं सुनावलेल दिसत आहे.
नेमकी चूक कोणाची आहे हे समोर आलं नसलं तरी निक्की तिला टोमणा मारताना दिसतेय. “तू सुरजला घर देणार असं कबूल केलं आहेस म्हणून तू त्याला काहीही बोलू शकत नाहीस”, असं निक्की म्हणते. हे ऐकून अंकिता चकित होते आणि काय असं उत्तर देते. कदाचित अंकिताच्या या उत्तरावरुन अंकिताच्या मनात याबद्दल काहीही नसावं असे स्पष्ट होतं, मात्र निक्कीने हा विषय ताणून धरला असल्याचे दिसतेय. समोर आलेल्या प्रोमोत अंकिता सूरजला बोलते, “खुर्चीवर पण तू सांडवल आहेस का?”. यावर निक्की मध्ये पडते आणि म्हणते, “जाऊ देना आता किती त्याला टोकायचं”.
यावर अंकिता रागात सूरजला म्हणते, “जाऊदे तू तिचंचं ऐक”. यावर निक्की म्हणते, “प्रत्येक गोष्टीवर त्याला टोकायचं. तुम्ही त्याला घर देत आहात म्हणून त्याच्यावर इतका अत्याचार करु नका”. यावर अंकिता काय असं म्हणते. त्यानंतर अभिजीत व पॅडी बाथरूम एरियामध्ये बोलत असतात, तेव्हा अभिजीत पॅडीला म्हणतो, “सारखं सारखं टोकणं त्याला आवडत नाही”. यावर पॅडी अभिजीतला म्हणतो, “निक्कीच्या मताशी सहमत आहेस तू”, असं म्हणतो. यानंतर निक्की म्हणते, “तुमचं खरं बाहेर आलं की तुम्हाला ते टोचतं”.