सोमवार, एप्रिल 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आधी आई अन् आता राखी सावंतकडून अरबाजच्या साखरपुड्याची बातमी समोर, निक्कीला काही सुचेना, म्हणाली, “तो समोर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 29, 2024 | 10:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss marathi 5 rakhi sawant on nikki tamboli

'बिग बॉस मराठी'च्या घरात राखी सावंतचा अरबाजवरुन निक्की तांबोळीला थेट सवाल

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाच्या विकेंडला एक्स स्पर्धकांनी हजेरी लावत कार्यक्रमाची रंगत वाढविली. ‘बिग बॉस’च हे यंदाचं पर्व विशेष धुमाकूळ घालताना दिसलं. त्यात भर घालायला ‘बिग बॉस’च्या एक्स स्पर्धकांची घरात एंट्री झालेली पाहायला मिळाली. dramaqween राखी सावंतच्या एंट्रीने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. राखीच्या एंट्रीने निक्कीची हवा टाईट झालेली पाहायला मिळाली. घरात येताच राखीने निक्कीला चांगलंच सुनावलं आणि तिची खरडपट्टी काढली. राखीने घरात पाऊल ठेवल्यावर निक्कीची फिरकी घेण्यास सुरुवात केली.

इतकंच नव्हे तर राखीने घरातील इतर सदस्यांचीही बोलती बंद केली. सुरुवातीला घरात येताच ती निक्कीला म्हणाली, “तू माझे कपडे चोरले?, माझी बाई गेली कुठे तेच मी म्हणत होते तर ती इथे आहे. सस्ती राखी सावंत. हा काय प्रकार? ही त्या सीझनमध्ये होती. तिथे एकाही मुलाला सोडलं नाही. ओ वर्षा ताई ऐकलंत का? या कोपऱ्यात आय लव्ह यू. त्या कोपऱ्यात आय लव्ह यू बोलून ही शेवटपर्यंत राहिली आणि बाकी सगळे बाहेर गेले”.

आणखी वाचा – Bigg Bossच्या घरात प्राजक्ता माळी व गश्मीर महाजनीची एंट्री, अभिजीतला नाचवलं, तर निक्कीच्या ठुमक्यांनी झाले घायाळ, काय आहे नवा ट्विस्ट?

राखी पुढे सर्व सदस्यांची फिरकी घेते. शिवाय निक्कीची आई आली तेव्हा त्यांनी अरबाजचा साखरपुडा झाला आहे असं निक्कीला सांगितलेलं असतं. हे ऐकून निक्कीचा पारा चढतो. अरबाज खोटं बोलला असं तिला वाटत असतं. यावरुन आता राखीही निक्कीला विचारते, “अरबाजचा साखरपुडा झालाय हे खरंय का?”. यावर निक्की काहीच उत्तर देत नाही. हे ऐकून इतर सदस्यही चकित होतात. हे पाहून पुढे राखी म्हणते, “ही कोपऱ्यात बसून रडत होती. त्याचा कप घेऊन बसलेली. सारखं मिस करतेय, मिस करतेय. राणी एकटी पडली माझा राजा बाहेर आहे असं सगळं सुरु होतं”.

आणखी वाचा – वर्षभरातच घटस्फोट, दुसरा साखरपुडाही मोडला, पुन्हा अभिनेत्रीशी थाटला संसार अन्…; आता कसं आयुष्य जगतो सुप्रसिद्ध अभिनेता

पुढे राखी मस्करीत “प्रत्येक सीझनमध्ये तुझ्या फिलिंग्ज बाहेर येतात. तुम्ही बाहेर जाऊन हे सगळं आधीच्या सीझनचं बघा. ही मस्त परफ्युम मारते. ती मुलं पटवण्याचा परफ्युम मारते आणि जाते मग, हिला कोणीच नॉमिनेट करत नाहीत”, असंही गमतीत म्हणते. राखी गेल्यावर सगळेच जण बसलेले असतात तेव्हा निक्की सर्वांना म्हणते, “आधी आई बोलली आता राखी बोलली म्हणजे नक्कीच त्याच बाहेर काहीतरी असणार. तो जर माझ्या समोर आला तर माझा बांध फुटेल. मी आतून खूप खवळलेय. तो ग्रँड फिनालेला येणार तेव्हा मी त्याला कसं फेस करु समजत नाहीय”. यावर घरातील मंडळी निक्कीला समजवतात.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5rakhi sawant on nikki tamboli
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 vishakha subhedar on paddy kamble

शेवटच्या आठवड्यापर्यंतचा मित्राचा प्रवास पाहून भारावल्या विशाखा सुभेदार, पॅडीबद्दल काळजी व्यक्त करत म्हणाल्या, "त्याच्या मनात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.