गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तो उगाचच टोमणे मारायचा”, पॅडीबरोबरच्या बॉण्डबद्दल वर्षा उसगांवकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, “मला टोचून बोललेलं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 5, 2024 | 9:45 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 varsha usgaonkar on paddy kamble

'बिग बॉस'च्या घरातील पॅडीच्या वागणुकीबाबत वर्षा उसगांवकरांचं भाष्य

Bigg Boss Marathi Season 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाच्या पर्वात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. वर्षा उसगांवकर यांनी अगदी पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरात स्वतःच असं साम्राज्य उभं केलं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. त्यांच्या शाब्दिक व विनोदी बुद्धिमत्तेने त्या साऱ्यांच्या वरचढ ठरल्या. वर्षा यांनी आजवर चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिले असून सिनेविश्वात त्यांचं नाव अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे कायमच इतक्या वर्षांचा प्रवास केल्यानंतर वर्षा यांचा आदर हा साऱ्यांच्याच मनात असलेला पाहायला मिळतो आणि या आदरापोटी, या प्रेक्षकांच्या प्रेमापोटी वर्षा ‘बिग बॉस’च्या घरात ७० दिवसांपैकी ६७ दिवस तग धरुन राहिल्या.

मात्र नुकत्याच झालेल्या मिड विक एलिमिनेशनमध्ये वर्षा यांना घराबाहेर पडावे लागले. फिनालेच्या जवळ येऊन घराबाहेर पडणे हे अनपेक्षित असल्याचं म्हणत वर्षा यांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. मात्र हा प्रवास उत्तम होता असं म्हणत त्यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी देखील पोस्ट केली. आता वर्षा घराबाहेर पडल्या असून त्या माध्यमांना मुलाखती देताना दिसत आहेत. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत वर्षा यांनी पॅडी बरोबरच्या त्यांच्या वागणुकीबद्दल भाष्य केलेलं पाहायला मिळतेय. वर्षा यांचा झालेला अपमान असो वा टास्क दरम्यान असो पॅडी कधीच वर्षांच्या बाजूने उभा राहिला नाही यामुळे बरेचदा तो घराबाहेर ट्रोलही होताना दिसला.

आणखी वाचा – धावत आला, मिठी मारली अन्…; Bigg Boss च्या घरात अरबाजची एण्ट्री, निक्की विचारणार जाब, व्हिडीओ व्हायरल

आता यावर वर्षांनी पॅडी बद्दल स्वतःचं मत व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे. वर्षा बोलताना असं म्हणाल्या की, “आमचा बॉण्डबद्दल सांगायचं तर, इंडस्ट्रीमध्ये मी आजपर्यंत पंढरीनाथबरोबर कुठलंही काम केलेलं नाही आहे. पण मला त्याच्याबद्दल सदभावना होती आणि अजूनही आहे. पण ‘बिग बॉस’च्या घरात आमचे खटकेच उडाले. सुरवातीला मला त्याच वागणं, बोलणं योग्य वाटलं. कोणतीही तक्रार न करता तो त्याची काम करायचा. पण नंतर नंतर मला असं वाटलं की, तो उगाच टोमणे मारतोय. कारण त्याला थोडंसं टोचून बोलायची सवय आहे. ते मला अजिबात आवडत नाही. कारण नसताना टोचून बोललेलं मला अजिबात नाही. असं दोन-तीन वेळा झालं. आणि त्याने मला एक प्रश्न विचारला तो मला अवाजवी वाटला”.

आणखी वाचा – Phullwanti Trailer : ‘फुलवंती’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, प्राजक्ता माळीच्या अस्मानी सौंदर्याचं होतंय कौतुक

पुढे त्या म्हणाल्या, “त्याने मला सांगितलं, ही तुमची खूप काळजी करते, त्या टास्कमध्ये तुम्हाला लागलं का?, हे तिचं विचारणं तुम्हाला प्रामाणिक वाटतं का?, ती चांगली आहे का?, मग आधीचं तुम्ही सर्व विसरलात का?, हा काय प्रश्न झाला. अशा प्रकारचं त्याच टोचून बोलणं, आणि त्याची ही विचारसरणी मला अजिबात पटली नाही. त्यामुळे त्याच आणि माझं अजिबात पटलं नाही. एव्हिक्ट झाल्यावर जाताना त्याने माझी माफी मागितली. अर्थात मी त्याला माफ केलं. आणि ते काही मी मनात धरेन असं नाही आहे”.

Tags: bigg boss marathi season 5paddy kamblevarsha usgaonkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 varsha usgaonkar on suraj chavan

"ज्या परिस्थितून तो आला आणि…", सूरजच्या गावी जाणार वर्षा उसगांवकर, म्हणाल्या, "प्रसिद्धी मिळाली त्यानंतर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.