Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. यंदाच्या या पाचव्या पर्वात विविध कलाक्षेत्रातील कलाकार मंडळींनी धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सोशल मीडियावर ही या शोची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या या पाचव्या पर्वाचे अवघे काही दिवस शिल्लक असलेले पाहायला मिळत आहेत. १०० दिवसांचा असणारा हा प्रवास ७० दिवसांवर आला असल्याचं समोर आलंय. याबाबतचा खुलासा ‘बिग बॉस’ यांनी गेल्या आठवड्यात केला. यंदाच्या या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमध्ये ‘बिग बॉस’च्या घरातील आठही स्पर्धकांचा समावेश होता.
या आठवड्यात धनंजय पवार, सूरज चव्हाण, पॅडी कांबळे, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगावकर हे आठही सदस्य नॉमिनेशनच्या प्रक्रियेत होते. दरम्यान प्रेक्षकांनी दिलेल्या वोटनुसार आता या नॉमिनेशनच्या प्रक्रियेतून चार कलाकार सेफ झाले असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच झालेल्या भागात ‘फुलवंती’ चित्रपटाची टीम ही ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांना भेटण्यासाठी आली होती. यावेळी फुलवंती चित्रपटाच्या निर्माती व अभिनेत्री प्राजक्ता माळी व अभिनेता गश्मीर महाजनी याने स्पर्धकांसह धमाल मस्ती केलेली पाहायला मिळाली.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून पॅडी कांबळेची एक्झिट, फिनालेपूर्वी संधी हुकल्याने नाराजी, अश्रू अनावर
यावेळी दोघांनी स्पर्धकांसमोर या आठवड्याच्या नॉमिनेशन मधून सेफ असणाऱ्या दोन स्पर्धकांची नावे जाहीर केली आणि या दोन नावांमध्ये अभिनेत्री निक्की आंबोळी आणि सूरज चव्हाण या दोघांची नावं समोर आली. त्यानंतर पाणी चित्रपटानिमित्त आदिनाथ कोठारे व सुबोध भावे आले होते त्यांनी अभिजीत सावंत व वर्षा उसगांवकर या दोन सदस्यांची नाव घेत त्यांना सेफ केलं. यानंतर उर्वरित चार सदस्य डीपी, जान्हवी, अंकिता व पॅडी नॉमिनेशच्या प्रकियेसाठी उभे राहिले.
आणखी वाचा – नव्या घरात रुपाली भोसलेने बनवला ‘हा’ पहिला पदार्थ, स्वयंपाकघरही आहे इतकं सुंदर, व्हिडीओ समोर
यावेळी पॅडी कांबळेचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आणि अंकिता, डीपी व जान्हवी हे सदस्य सेफ झाले. आता उर्वरित सात सदस्यांमधून कोणता स्पर्धक ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरणार हे पाहणं रंजक ठरेल.