Bigg Boss Marathi Season 5 : यंदाचं ‘बिग बॉस मराठी’चं पर्व विशेष गाजताना दिसलं. ‘बिग बॉस’च्या घरात असलेले स्पर्धक अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसले. यंदाच्या पर्वात केवळ कलाकार मंडळीचं नव्हे तर रॅपर, गायक, रील स्टारला संधी मिळाली. मालिकाविश्वातील खलनायकी चेहरा म्हणून लोकप्रिय असलेल्या जान्हवी किल्लेकरच्या एंट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. जान्हवी अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेली दिसली. जान्हवीने केलेल्या वक्तव्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकलेलीही दिसली. घरातील सिनियर सदस्यांच्या करिअरवर जान्हवीने बोट उचलताच सर्वत्र संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली.
वर्षा उसगांवकर व पॅडी कांबळे या दिग्गज कलाकारांच्या करिअरवर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे जान्हवीला आठवडाभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिलेली. या शिक्षेमुळे बाहेर प्रेक्षक खूप खुश झाले. पण जान्हवीच्या कुटुंबाला मात्र खूप वाईट वाटले. त्यानंतर जान्हवीने पॅडी कांबळे यांची माफीही मागितली. या चुकांनंतर जान्हवी एकटीने खेळ खेळताना दिसली. सर्व चुका मान्य करत पुन्हा कधीही त्या चुका न करण्याचा निश्चय तिने केला.

जान्हवीला तिच्या चुकांचा पश्चाताप झाला असला तरी घरातील कोणत्याच सदस्याने तिला हवा तसा पाठिंबा दिला नाही. त्यानंतर जान्हवी स्वतःसाठी आणि एकटीने लढताना दिसली. कालच्या भागात अभिजीतने जान्हवीला तिच्या चुकांवरुन टोकलं. यावेळी निक्कीही मध्ये पडली. जान्हवी बदलली असं त्यांचं म्हणणं होतं. यावरुन आता जान्हवीच्या जाऊबाई संध्या किल्लेकर हिने स्टोरी पोस्ट करत जान्हवीला पाठिंबा दिलेला पाहायला मिळत आहे.
पोस्ट शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “चुका मान्य केलेल्या आणि बदललेल्या जान्हवीला असंही घरातील इतर सदस्यांनी “टीम बी)ने ही कधीच सपोर्ट केला नाही. आणि स्ट्रॉंग प्लेअर म्हणून आजच काय नेहमीच तिला टार्गेट केलं गेलं. तिच्या चुका सुधारुन तिने हा गेम स्वबळावर खेळला आहे. जिद्दीने. जान्हवीने वेळोवेळी घेतलेला निर्णय हा माणसांनुरुप आणि परिस्थिती अनुसरुन होता जो कायम योग्यच होता. आणि ही जान्हवी हरवलेली नाही तर स्वतःला सापडलेली जान्हवी आहे. जी भविष्यात प्रेक्षकांच्या पसंतीस कायम असेल”.