Nikki Tamboli Troll : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा शेवटचा आठवडा राहिला असून आता या पर्वात नेमका कोणता स्पर्धक विजेता ठरणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान यंदाचं हे पर्व विशेष गाजलं. यंदाच्या या पर्वात हिंदी ‘बिग बॉस’ फेम निक्की तांबोळीची एंट्री पाहायला मिळाली. अगदी पहिल्या दिवसापासून निक्की या घरात धुमाकूळ घालताना दिसली. सोशल मीडियावरही निक्कीची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. निक्कीने तिच्या खेळाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. आता निक्की ‘बिग बॉस’च्या घरात फायनलिस्ट ठरली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात असताना निक्की स्पर्धकांमध्ये नेहमीच वरचढ ठरली. घरातील प्रत्येक सदस्याशी तिचं वाजलेलं पाहायला मिळालं. बरेचदा ती सर्वच स्पर्धकांचा अपमान करताना दिसली, यामुळे ती अनेकदा ट्रोलही झालेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीने नेहमीच वेस्टर्न आऊटफिटला प्राधान्य दिलं. आता नवरात्रीचं औचित्य साधत निक्कीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये निक्की गरबाचा आऊटफिट परिधान करत नवरात्रीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.
नवरात्रीच्या शुभेच्छा देताना निक्कीने परिधान केलेले तोकडे कपडे पाहून नेटकरी भडकले आहेत. सणाला हे असे कपडे कोण घालतं, असं म्हणत तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट करत, “शी काय तो ड्रेस घातलाय”, “सणांना असले कपडे कोण घालतं”, “हे असले कपडे घालून देवाचं नाव पण घेऊ नकोस”, “बाई हा काय प्रकार”, “मराठी मुलीला हे कपडे शोभत नाहीत”, “या बाईला ‘बिग बॉस’ विनर बनवायचं?, जिला धड ड्रेस घालता येत नाही”,असं म्हटलं आहे.
तर आणखी काही युजरने व्हिडीओवर कमेंट करत, “बाई काय प्रकार हा, पागल झाली आहे का?”, “तुला लाज वाटत नाही”, “कुठे आहे मराठी संस्कृती”, “काय बाय निक्की तुझी कपडे. बाई कसं लाईक करायचं. बाई जरा चांगले कपडे घाल”, “गळ्यात हा काय प्रकार? नसतं घातलं तरी चालले असते”, “मॅडम आधी कपडे नीट घालायला शिका”, “अगं, तू ओढणी घ्यायला विसरलीस. नवरात्रीच्या शुभेच्छा”, “जरा कपडे व्यवस्थित घाला”, असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.