शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मदत करणार असं कॅमेरासमोरच का सांगितलं?, सूरजवरुन निक्की तांबोळीचा अंकिताला टोला, म्हणाली, “फक्त सहानुभूतीसाठी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 9, 2024 | 4:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nikki Tamboli statement

'बिग बॉस मराठी' सीझन ५ फेम निक्की तांबोळीचा सूरजवरुन अंकिताला टोला

‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आलेल्या बारामतीच्या सूरज चव्हाणने यंदाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. पहिल्या दिवसापासूनच तो ठाम होता की, ट्रॉफी तोच घेऊन जाणार आणि सूरजने ते सिद्ध करुन दाखवले. अवघ्या राज्यभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर घराबाहेर पडल्यानंतर सर्वत्र सूरजच जंगी स्वागत होताना पाहायला मिळत आहे. सूरजची सर्वत्र हवा असलेली पाहायला मिळत आहे. घराबाहेर आल्यानंतर इतर स्पर्धकही चर्चेत आलेले पाहायला मिळत आहे. सूरजबरोबरचं निक्की तांबोळीचीही ‘बिग बॉस’मध्ये हवा सुरु असलेली पाहायला मिळाली. आता निक्कीने सूरजबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. (Nikki Tamboli statement)

निक्कीने नुकतीच इट्स मज्जा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना निक्कीला सूरजच्या नावाखाली अनेकांनी क्रेडिट घेतलं, सहानुभूती मिळवली असं तू शोमध्ये बोलली, याबाबत तू काय सांगशील?”. याचं उत्तर देत निक्की म्हणाली, “मी शोमध्ये सुद्धा असं म्हटलं आहे की, काही लोकांनी सहानुभूतीसाठी बरंच काही म्हटलं. उदाहरण द्यायचं तर मी एका रिऍलिटी शोमध्ये बसले आहे, समोर १०० कॅमेरे आहेत. मी तुला भाऊ मानते पण मी तुला कॅमेरासमोर तर असं बोलणार नाही की, मी बाहेर गेल्यानंतर सूरज तुला घर देईल. मी तुला देईलच, पण ते बाहेर जाऊन देईल मग इथे तुम्ही १०० कॅमेरासमोर असं म्हणत आहात म्हणजे तुम्ही सहानुभूतीसाठीचं हे म्हणत आहात. याचा अर्थ हाच होतो”.

आणखी वाचा – “त्याचा भूतकाळ मी स्वीकारला आणि…”, अरबाजबरोबरच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली निक्की तांबोळी, म्हणाली, “सगळं स्वीकारुन…”

पुढे ती असंही म्हणाली की, “यांत शंका नाही की, ते मदत करणार नाहीत. अर्थात ते बाहेर जाऊन मदत करणारच आहेत किंवा भावाचं नातं ते सांभाळतील. पण १०० कॅमेरासमोर मी तुझ्यासाठी बाहेर जाऊन हे करेन असं बोलणं पूर्णतः चुकीचं आहे. एखादं नवं जन्मलेलं बाळही म्हणेल की हे सगळं सहानुभूतीसाठी आहे”. ‘बिग बॉस’च्या घरात असताना सहानुभूतीच्या मुद्द्यावरुन निक्कीने अंकिताचे कान टोचले होते.

आणखी वाचा – “परत विचारु नका तिने काय केलं”, जान्हवी किल्लेकरला हिणवणाऱ्यांना नवऱ्याचं उत्तर, म्हणाला, “हात जोडून माफी मागत…”

एका टास्कदरम्यान अंकिता सूरजला नॉमिनेट करते. तेव्हा निक्की चिडते आणि तिने जपलेली ही नाती सहानुभूतीची वापरत असल्याचं तिने म्हटलं आहे. निक्की अंकिताला म्हणते, “तू इथे सहानुभूती दाखवायला बोललं नाही पाहिजे होतं की मी घर बांधणार आहे”. यावर अंकिताही उत्तर देत म्हणते, “त्याच घर मी बाहेर गेल्यावर बांधणार आहे”. यावर निक्की म्हणते, “हो तेच तू इथे सांगायला नाही पाहिजे होतं. सहानुभूतीसाठी तू इथे बोललीस. तुझे हे डाव आम्हाला चांगले कळतात. तुला घर दिलं याचा इन्स्टाग्रामवर ती फोटोही टाकेल”.

Tags: bigg boss marathi season 5nikki tambolinikki tamboli statement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Suraj Chavan Irina Rudakova and Vaibhav Chavan met video

Video : इरीना-वैभव यांनी घेतली सूरजची भेट, तिघांनी एकत्र डान्सही केला अन्...; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.