‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं आहे. सूरजच्या या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात नेहमीच चर्चेत राहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवलं आणि अखेर या शोची ट्रॉफी जिंकत त्याने सर्वांची मनंदेखील जिंकली. ट्रॉफी जिंकताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाण चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या सगळीकडे फक्त त्याच्याच नावाची चर्चा सुरु आहे. (Suraj Chavan Irina Rudakova and Vaibhav Chavan Met)
सूरज ट्रॉफी घेऊन त्याच्या गावालाही पोहचला होता. त्याने त्याच्या शाळेलाही भेट दिली. यावेळी त्याने शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबतही संवाद साधला. सूरजने त्याच्या या ट्रॉफीचं त्याच्या आईवडिलांना दिलं आहे. त्याचप्रमाणे सध्या सगळीकडे सूरज चव्हाण या एकाच नावाची हवा आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर त्याने बी टीममधील सर्व सदस्यांची भेट घेतली होती. अंकिता, डीपी यांनी व सूरज यांनी एकत्र जेवणही केलं होतं. अशातच सूरजने नुकतीच इरीनाचीही भेट घेतली आहे.
इरीनाने सूरजच्या या भेटीचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इरीना व सूरजबरोबर वैभवदेखील होता आणि यावेळी या तिघांनीही मिळून सूरजच्या गाजलेल्या झापुक झुपूकवर धमाल डान्सही केला आहे. सूरजच्या विजयामुळे इरीना व वैभव या दोघांनाही भलताच आनंद झाल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. इरीना सूरजबरोबरचा हा व्हिडीओ शेअर करत त्याला अभिनंदनही म्हटलं आहे.
दरम्यान, या व्हिडीओला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली काहींनी सूरजच्या विजयाचे कौतूक केलं आहे. तसंच काहींनी वैभव व इरीना या जोडीचेदेखील कौतूक केलं आहे. “तुमची जोडी खूप चांगली दिसते”, “सूरजला सपोर्ट केल्याबद्दल इरीनाचे धन्यवाद”, “खूप छान”, “झापुक झुपूक”, “लय भारी” या आणि अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.