शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : निक्की-अभिजीतच्या मैत्रीला कायमचा तडा?, वैभवबाबतच्या चुगलीची केली पोलखोल अन्…; नेमकी चूक कोणाची?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 11, 2024 | 12:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 nikki and abhijeet frienship breaks down

अभिजीत-वैभवमध्ये झालाय राडा, निक्की-अभिजीतमधील मैत्रीही संपली

‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांमधील सततचे वाद, भांडण, हाणामाऱ्या आता आणखी कोणतं वळण गाठणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांनी तुफान राडा घातलेला पाहायला मिळाला. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून हा शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. बरेचदा स्पर्धकांचे वाद, प्रेम, मैत्री, जिव्हाळा हे सारं काही एकाच घरात एका छताखाली पाहायला मिळत आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळी या स्पर्धकाने अल्पावधीतच साऱ्यांचे लक्ष वेधले.  (Bigg Boss Marathi Season 5)

सुरुवातीला निक्की अरबाज पटेलबरोबर खेळताना दिसली. मात्र भाऊच्या धक्क्यावर टीम ए ची पोलखोल केल्याने निक्की अरबाज यांच्यात दुरावा आला. त्यांनतर निक्की अभिजीतबरोबर खेळताना दिसली. अभिजीत व निक्कीची चांगली व निखळ मैत्री आहे. दोघेही विरुद्ध टीम मधून खेळत असले तरी त्यांचं नेहमीच पटलं असून दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसले. अभिजीतने निक्कीवर विश्वास ठेवून गेम प्लॅनबद्दल तसेच स्पर्धकांबद्दल चर्चाही केलेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की-अभिजीतचं वाजलं, दोघांमध्ये बोलणं अंकिताला पडलं महागात, उलट तिलाही सुनावलं, म्हणाला, “तू काय केलं ते बघ…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अशातच आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की व अभिजीतच्या मैत्रीत फूट पडलेली पाहायला मिळत. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, निक्कीसमोर विश्वासाने अभिजितने वैभव बाबत केलेलं गॉसिप समोर आणलं आहे. निक्कीचं हे वागणं अभिजीतला खटकलेलं पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, वैभव अभिजीतला जाब विचारतो की, “तू माझ्या मागे हिला काय बोलला”. यावर अभिजीत म्हणतो, “अरे बाबा मी तुझ्या मागे नाही बोललो”. यावर निक्की मध्ये पडते, आणि म्हणते, “तू ते नाही म्हटलं का की आम्ही याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने पुन्हा तेच केलं”.

आणखी वाचा – मलायका अरोराच्या वडिलांचे निधन, छतावरुन उडी घेत केली आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

निक्कीचं हे बोलणं ऐकून अभिजीतचा पारा चढतो. अभिजीत निक्कीला म्हणतो, “तुला मित्र समजून मी काही बोलायला गेलो हीच मोठी चूक झाली. याच्यापुढे तू माझ्याकडे येऊ नको मी तुझ्याकडे येणार नाही. असे मित्र आयुष्यात कधी ठेवू नये”, असं म्हणत तिच्याशी असलेलं मैत्रीचं नातं तोडलं.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5nikki tamboli and abhijeet sawant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Malaika Arora Father Died arbaaz khan reached ex wife home

मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या करत संपवलं जीवन, कठीण काळात पूर्वाश्रमीच्या पतीचा आधार, सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.