Bigg Boss Marathi Season 5 New Promo : ‘बिग बॉस’चं घर म्हटलं की भांडण हे आलंच. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून अगदी पहिल्या दिवसापासून या शोमध्ये स्पर्धकांमध्ये वादावादी सुरु असलेली पाहायला मिळाली. प्रत्येक स्पर्धक स्वतःला सिद्ध करण्यासाठी, घरात टिकून राहण्यासाठी लढताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात १०० दिवस सतत तेच तेच चेहरे पाहून स्पर्धकांमध्ये आता वाद होताना पाहायला मिळत आहे. एकमेकांच्या न पटलेल्या गोष्टींवरुन हे वाद वाढत जाताना दिसत आहेत.
अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाच्या एका प्रोमोने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एकाच गटात असलेल्या दोन स्पर्धकांमध्ये हा वाद झालेला पाहायला मिळतोय. धनंजय पवार आणि आर्या जाधव या दोन्ही स्पर्धकांमध्ये कमालीचा वाद झालेला पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये बाचाबाची झालेलीही दिसली. दोघांमधील हा वाद वाढलेला असून नेमकं खाण्यापर्यंत झालेला हा वाद का झाला हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये जेवणावरुन धनंजय व आर्या यांच्यात वाद झालेला पाहायला मिळत आहे. धनंजयने आर्याला तिच्या खाण्यावरुन टोकलं आहे. दोघांमध्ये हा वाद झाला असून आर्याने धनंजयला त्याच्याच भाषेत उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. एकमेकांची तोंड बंद करेपर्यंत हा वाद झालेला दिसत आहे. धनंजय व आर्या हे दोन्ही स्पर्धक एकाच गटात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकाच गटात आता वाद झाल्याने याचा ग्रुपवर काही फरक तर पडणार नाही ना हे पाहणं रंजक ठरणार आहे.
धंनजय आर्याला म्हणतो, “मला असं वाटत की, कमी खा”. यावर आर्या म्हणते “माझ्या जेवणावर कमेंट करायचं नाही. मी एकदा, दोनदा, तीनदा खाईन. तुम्ही मला नका सांगू”. यावर धनंजय म्हणतो, “माझ्यासमोर तुझं तोंड बंद कर”. यावर आर्या अरेरावीची भाषा करते आणि म्हणते, “नाही करणार”. यावर धनंजय म्हणतो, “मग मी तुला खाताना बोलणार”. यावर आर्या म्हणते, “मी तुमचं ऐकायला इथे आले नाही”. यावर धनंजय म्हणतो, “मग मी तुला माझं एक असं कुठे सांगितलं आहे”.