शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासू-सासऱ्यांचा योगिता चव्हाणला फुल्ल सपोर्ट, नवऱ्याबाबातही केलं भाष्य, म्हणाली, “नवरा माझ्याबरोबरच आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 30, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Yogita Chavan Bigg Boss Journey

सासू-सासऱ्यांचा योगिता चव्हाणला फुल्ल सपोर्ट, नवऱ्याबाबातही केलं भाष्य, म्हणाली, "नवरा माझ्याबरोबरच आणि..."

‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिनेत्री योगिता चव्हाणची एण्ट्री पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’सुरु होऊन अवघे एक-दोन दिवस झाले आहेत मात्र योगिता तितकी चर्चेत आलेली दिसली नाही. सध्या योगिता इतर स्पर्धकांबद्दल जाणून घेताना दिसत आहे. त्यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे. जीव माझा गुंतला या मालिकेमुळे योगिताला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौगुले ही जोडी चर्चेत आलेली पाहायला मिळाली. या मालिकेनंतर योगिता कोणत्याही मालिकेत झळकली नाही तर ती थेट ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घालताना दिसली. (Yogita Chavan Bigg Boss Journey)

‘बिग बॉस मराठी’च्या घरात येण्याचा निर्णय घेतल्यानंतर योगिताला माहेर तसेच सासरच्या मंडळींकडून उत्तम पाठिंबा मिळाला. याबाबतच तिने सांगितलं की, “माझ्या घरातले सगळेच खुश होते. माझ्या घरचे, सौरभचे(पती) आई-वडीलही खूश आहेत. त्यांना समजावून या शोमध्ये आले. त्यांनीही समजून घेतलं कारण सगळेच खूप समजूतदार आहेत. तू जा भीड, लढ अशी सगळ्यांची प्रतिक्रिया होती. माझे मित्र-मंडळीही खूप खुश आहेत. तू चालली आहेस ‘बिग बॉस’मध्ये?, तू या निर्णयावर ठाम आहेस ना…अशा त्यांच्याही प्रतिक्रिया होत्या. जो तो येऊन अशी वाग, हे करु नको ते करु नको असं सतत सांगत होता. सगळेच येऊन अशावेळी शिकवायला लागतात. या घरात कसं वागायचं? हे सांगत असतात. पण इथे काय घडणार हे देवालच माहित”.

आणखी वाचा – १६ माणसांचा स्वयंपाक बनवू शकत नाहीत वर्षा उसगांवकर, पोळ्या बनवायलाही जमेना, म्हणाल्या, “फुटेजसाठी काहीही करणं…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘बिग बॉस मराठी’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिने शेवटचा कॉल कोणाला केला? याबाबतही सांगितलं. योगिता म्हणाली, “घरात येण्यापूर्वी शेवटचा कॉल मी माझ्या बाबांना केला. माझा नवरा माझ्याबरोबरच होता. त्यामुळे त्याला फोन करण्याचा प्रश्न येत नाही. माझे बाबा फार घराबाहेर पडत नाहीत. बिग बॉस काय आहे हेही त्यांना फार माहित नाही. टीव्हीही ते फार बघत नाहीत. मी जात आहे, शंभर दिवस मी नसणार आहे. मी जाऊ का? त्यांनी “जा” इतकंच उत्तर दिलं. माझे वडील असेच आहेत”.

आणखी वाचा – “माझ्या चारही बहिणी खूप रडल्या आणि…”, चार सख्ख्या बहिणी मिळून करतात सूरज चव्हाणचा सांभाळ, घरात गुलीगत सगळ्यांना नडणार

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून ही सौरभ व योगिता ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली. मालिकाविश्वातील ही रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही एकत्र आली. विवाह होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली कोणत्याच माध्यमाद्वारे दिली नव्हती. तर थेट लग्न सोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात योगिता काय धुमाकूळ घालणार?, हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5entertainmentyogita chavanYogita Chavan Bigg Boss Journey
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi new season update Nikki Tamboli mentioned Varsha Usgaonkar singularly and commented on her character.

"पाय वरती करुन झोपता, तुमचा माज अक्कल अन्...", निक्कीकडून वर्षा उसगांवकरांचा घाणेरड्या शब्दांत अपमान, म्हणाली, "मोठ्या कलाकार असाल घरी..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.